त्र्यंबकेश्वर अकोलकर बातमी

त्र्यंबकेश्वर अकोलकर बातमी
Published on: 
मुख्य अंक पान--३ ------------ NSK26H31225 शेनवड (ता. इगतपुरी) ः एव्हीएन्ट कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधलेल्या जलकुंभाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थ. -------------- ३६-३ आदिवासी बारा पाड्यांवर छोटे जलकुंभ ---------- शेनवड, धारगाव येथे लोकार्पण ः महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.२ ः इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई दूर करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी, पुणे आणि एव्हीएन्ट कंपनीतर्फे सीएसआर निधीतून बारा वाड्यांवर पंधरा हजार लिटर क्षमतेच्या फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या जलकुंभ बांधून देण्यात आले आहेत. यामुळे आदिवासी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरण्यास आहे. -------------- शेनवड येथील शिवाची वाडी व धारगाव येथील वाघ्याची वाडी येथे शुक्रवारी (ता.२) कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास एव्हीएन्ट कंपनीचे अधिकारी राजेश पवार, मनोज पाटील, ज्ञानप्रबोधिनीचे स्वामी देवसेवानंद, नारायण पवार, ललित पेटार, पोपट भांगरे, ग्रामसेविका सरला राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे, संघ स्वयंसेवक हेमंत सुराणा यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित देशपांडे यांचे सहकार्य मिळाले. ज्ञान प्रबोधिनी गेली अनेक वर्षे या भागात शिक्षण, आरोग्य आणि जलसंधारणाचे काम करत आहे. शेनवड, कुरुंगवाडी, धारगाव, सोमज या परिसरातील छोट्या वस्त्यांमध्ये नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत, मात्र पाणी साठवण्यासाठी टाकी नसल्याने आदिवासी महिलांना रोज पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. या जलकुंभामुळे आता गावातच पाणी साठवणूक होणार असून महिलांची पायपीट थांबणार आहे. ‘गेले अनेक वर्षे आम्हाला डोंगर उतरून पाण्यासाठी जावे लागत होते. या टाकीमुळे आमच्या डोक्यावरचा हंडा उतरला, अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त करत ज्ञानप्रबोधिनी आणि एव्हीएन्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com