लोगो-- संकट दुष्काळाचे
३६-४
पाण्याची आत्तापासूनच काटकसर आवश्यक
जिल्हा प्रशासनाचे आवाहन ः धरणे भरलेली; पण प्रत्येकाने बचतीला प्राधान्य द्यावे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.८ : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकीकडे टँकरचा फेरा सुरु झाला असताना प्रमुख धरणांमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत धरणे ९२.७४ टक्के भरलेली असली तरी येत्या काळातील टंचाईचे संकट विचारात घेता प्रत्येकाने आत्तापासूनच पाण्याच्या थेंबा- थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चालूवर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. संकटाच्या याकाळात जिल्ह्यातील चार तालुक्यात सध्या ३७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, एकीकडे टँकरचा फेरा सुरु झालेला असताना जिल्ह्यातील प्रमुख २६ धरणांमध्ये सध्या एकत्रितरीत्या ६५ हजार ४९१ दलघफू एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीशी तुलना केल्यास यंदा धरणांमध्ये दोन टक्क्यांनी अधिक पाणी साठा उपलब्ध आहे.
नाशिककरांना पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणासह समूहात ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचवेळी दारणा समूहात ९० टक्के साठा शिल्लक आहे. या व्यतिरिक्त ओझरखेड व पालखेड समूहात अनुक्रमे ९२ तसेच ९५ टक्के पाणी आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील धरणेही ९० टक्क्यांच्या वर भरलेले आहेत. तूर्तास जिल्हावासियांच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. मात्र, एलनिनोचा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. परिणामी या कालावधीत उष्णतेत अधिक वाढ होताना धरणांतील बाष्पीभवनाचा वेगही वाढू शकतो. अशा परिस्थितीत संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी शासन व प्रशासनाच्या स्तरावर आत्तापासूनच नियोजन केले जात आहे. मात्र, येऊ घातलेले संकट लक्षात घेता सर्वसामान्यांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
---
१६-१
धरणसाठा (दलघफुमध्ये)
गंगापूर ४९६५, दारणा ६७७९, काश्यपी १८२०, गौतमी गोदावरी १८३४, आळंदी ७४०, पालखेड ५०४, करंजवण ५२०५, वाघाड २२०३, ओझरखेड २०१६, पुणेगाव ५२७, तिसगाव ४२१, भावली १४१८, मुकणे ५६८६, वालदेवी १०८०, कडवा १६२५, नांदुरमध्यमेश्वर १५७, वाकी २३१०, भाम २४४९, भोजापूर ३२५, चणकापूर २३८९, हरणबारी १०९६, केळझर ५४३, गिरणा २१८९०, पुनद १३०३, माणिकपुंज २३४.
---------------------
कोट-- फोटो वापरावा
नागरिकांना अखंड व सुनिश्चित पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पण, संभाव्य टंचाईचे संकट लक्षात घेता जिल्हावासियांनी पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करतानाच त्याचा काटकसरीने वापर करावा.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
---------------