निम्म्या शहरात 2 दिवस पाणीबाणी; पश्चिम, सातपूर, सिडको भागात हाय अलर्ट

Commissioner Dr. while inspecting pipeline repair work at Amrit Garden Chowk. Chandrakant Pulkundwar
Commissioner Dr. while inspecting pipeline repair work at Amrit Garden Chowk. Chandrakant Pulkundwaresakal

नाशिक : शनिवार (ता. २०) पासून शहरात विस्कळित झालेला पाणीपुरवठा अद्यापही कायम आहे. सातपूर- त्र्यंबक रोडवरील अमृत गार्डन चौकातील बाराशे मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे.

त्यामुळे पश्चिम व सातपूर विभागात पुढील दोन दिवस, तर सिडको विभागात २७ ऑगस्टला पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water shortage in half city for 2 days High alert in Nashik West Satpur CIDCO area Nashik Latest marathi news)

शनिवारी वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार होती. त्यामुळे पाणीपुरवठा विभागानेदेखील किरकोळ दुरुस्तीसाठी गंगापूर धरणातून पाणी उपसणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद होता, तर रविवारी (ता. २१) कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा झाला.

पाइपलाइनच्या किरकोळ दुरुस्त्या सुरू असताना अमृत गार्डन चौकात गंगापूर धरणाकडून येणारी बाराशे मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फुटली. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गुरुवार (ता. २५) पर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे काम होऊ शकले नाही.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी स्वतः दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सूचना त्यांनी अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना दिल्या.

काय आहे तांत्रिक अडचण?

बाराशे मिलिमीटर व्यासाची पीएससी सिमेंटची पाइपलाइनला गळती झाली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाइपलाइन गळतीचे काम २५ फूट खोल असल्याने ही महत्त्वाची अडचण आहे.

पाइपलाइन गळती ही मुख्य पाइपलाइनवर असल्याने पाणीपुरवठा बंद करूनच काम करावे लागते. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक भागात पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Commissioner Dr. while inspecting pipeline repair work at Amrit Garden Chowk. Chandrakant Pulkundwar
Bail Pola 2022 : पोळ्यामुळे बाजारपेठ सजली; खरेदीसाठी गर्दी

तीन विभागात दोन दिवस टंचाई

पश्चिम व सातपूर विभागामध्ये २६ व २७ ऑगस्ट हे दोन दिवस पाण्यासाठी ड्रायडे ठरणार आहे. दोन्ही दिवशी पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे, तर सिडको विभागात २७ ऑगस्ट ला पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

या भागात होणार नाही पाणीपुरवठा

सातपूर विभाग : जुना प्रभाग क्रमांक ११ मधील सातपूर कॉलनी, पपया नर्सरी परिसर, त्र्यंबक रोड परिसर, महाराष्ट्र हाउसिंग कॉलनी, सातपूर गाव, स्वारबाबा नगर, महादेव वाडी, जेपीनगर, सातपूर मळे विभाग, संतोषीमातानगर, गौतमनगर, कांबळेवाडी, सातपूर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिव कॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग, विकास कॉलनी, जुना प्रभाग क्रमांक २६ , मोगल नगर, साळुंखेनगर, वावरेनगर, शिवशक्तीनगर, आयटीआय परिसर, खुटवडनगर, मटालेनगर, आशीर्वादनगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुल.

पश्चिम विभाग : जुना प्रभाग क्रमांक १२- लवाटे नगर, संभाजी चौक, उषा किरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवासनगर, राहुलनगर, मुंबई नाका परिसर, मिलिंदनगर, मातोश्रीनगर, महेशनगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसर, वनविहार कॉलनी, संतकबीरनगर, पारिजातनगर, समर्थनगर, महात्मानगर.

सिडको विभाग : जुना प्रभाग क्रमांक २५- इंद्रनगरी कामटवाडे गाव व परिसर. जुना प्रभाग क्रमांक २७- अलिबाबा नगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्तनगर, कारगिल चौक चिंचाळे गावपरिसर, जुना प्रभाग क्रमांक २८- लक्ष्मीनगर अंबड गाव व परिसर, माऊली लॉन्स परिसर, वृंदावननगर अंबड गाव ते माऊली लॉन्समधील पूर्व व पश्चिमेकडील परिसर.

Commissioner Dr. while inspecting pipeline repair work at Amrit Garden Chowk. Chandrakant Pulkundwar
Spot Painting स्पर्धेतील चित्रांचा काळाबाजार; विजेती अनेक चित्रे गायब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com