Water Crisis : मनमाड रेल्वे स्थानकात पाणीटंचाई! प्रवाशांवर विकत पाणी घेण्याची वेळ

A closed water machine at a railway station
A closed water machine at a railway stationesakal

Water Crisis : येथील रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक महिन्यापासून वॉटर वेडिंग मशिन बंद असल्याने प्रवाशांना अल्पदरातील थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

त्यामुळे विकत पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत आहे. (Water shortage in Manmad railway station Time to buy water for passengers nashik news)

मनमाड रेल्वे स्थानक जंक्शन असल्यामुळे येथून देशभरात जाण्यासाठी गाडी उपलब्ध असते. त्यामुळे या स्थानकावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात अशातच उन्हाळा सुरू असल्याने घशाला कोरड पडत असते मात्र या रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेले वॉटर वेडींग मशिन मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना थंड आणि शुध्द पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

इतकेच नाही तर मशिन बंद असल्यामुळे प्रवाहांना पैसे खर्च करून विकत पाण्याची बाटली घ्यावी लागत असल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.

प्रवाशांना अल्पदरात शुध्द पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी भुसावळ मंडळातील महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनातर्फे वॉटर वेडिंग मशिन बसवण्यात आले होते. मनमाड स्थानकावरही चार ठिकाणी वॉटर वेडिंग मशिन बसवण्यात आले आहे.

या यंत्रणेमुळे प्रवासी यांना मनमाड रेल्वे स्थानकावर अतिशय अल्पदरात शुद्ध आणि थंड पाणी मिळत होते. यासाठी प्रवाशांना केवळ १ ते २५ रुपये पैसे मोजावे लागत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A closed water machine at a railway station
Weather Forecast : जिल्ह्यात आज अन मंगळवारसह बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज

मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून हे मशिन बंद असल्याने आणि नळ स्टँडवरील नळांना पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना विकत थंड पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने सदर मशिन सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

असे आहेत दर

३०० मिली : १ रुपये, बाटलीसह २ रुपये

५०० मिली : ३ रुपये, बाटलीसह ५ रुपये

१ लिटर : ५ रुपये, बाटलीसह ८ रुपये

२ लिटर : ८ रुपये, बाटलीसह १२ रुपये

५ लिटर : २० रूपये, बाटलीसह २५ रुपये

A closed water machine at a railway station
MPSC Success: मातृ- पितृ छत्र हरपलेल्या ‘आनंद’ चे यश! आयोगाच्या सहायक गटविकास अधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com