Nashik News : टंचाई आढावा बैठकीला मुहूर्त लागेना! आमदार, खासदार उदासीन; उपाययोजना रखडल्या

जिल्ह्यास भेडसावणाऱ्या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावलेली आढावा बैठक रद्द झाल्यानंतर अजून या बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही.
water scarcity
water scarcityesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यास भेडसावणाऱ्या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावलेली आढावा बैठक रद्द झाल्यानंतर अजून या बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही.

आमदार, खासदार स्वत:च्या मतदारसंघात व्यस्त असल्याने त्यांनाही या बैठकीचा विसर पडल्याचे दिसून येते. (water Shortage review meeting does not take time Measures stopped Nashik nmc News)

फेब्रुवारीत जिल्ह्यातील ४३६ गावे आणि वाड्यांना तब्बल १३३ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरुन जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती आपल्या लक्षात येईल. टँकरवर सर्वसामान्य जनतेची भिस्त असल्याने उत्तरोत्तर ही संख्या वाढतच जाणार आहे.

त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी पालकमंत्री भुसेंनी दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली होती. पण दोनच आमदार या बैठकीला उपस्थित राहिले. त्यातही आमदार सीमा हिरे या शहरातील असल्यामुळे त्यांच्याशी या विषयाचा फारसा संबंध येत नाही.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे बैठकीला उपस्थित होते, असेच म्हणावे लागेल. एरवीही जिल्ह्यात टंचाई व पाण्याच्या रोटेशनवरुन लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन बैठकीत आक्रमक भूमिका घेतात.

परंतु, चालूवर्षी दुष्काळाची परिस्थिती अधिक भयावह आहे. आताच १३३ टँकर सुरू आहेत. येत्या काळात हा आकडा पावणेचारशेवर जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.

water scarcity
Gharkul Scheme News: सव्वा लाखांत घर बांधण्याची कसरत; बांधकामासाठी लागणारे साहित्य महागल्याचा परिणाम

त्यामुळे केवळ टँकरसोबतच अन्य टंचाईच्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. नव्याने मुहूर्त काढण्याची वेळ प्रशासनावर ओढवली असली तरी ही बैठक कधी होणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही.

आचारसंहितेचा अडसर

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कुठल्याही दिवशी जाहीर होण्यासारखी सद्यःस्थिती आहे. तसे झाल्यास सर्व यंत्रणा या निवडणुकीच्या कामास लागतील.

अशावेळी टंचाई उपाययोजनांकडे पूर्णत: दुर्लक्ष होवू शकते. त्यामुळे उपाययोजनांसंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

water scarcity
NMC News : घरपट्टी देयेकांसाठी महापालिकेचे Android App!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com