शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणीा वाया गेले.

शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

मालेगाव - शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा धरणातून येणारी मुख्य जलवाहिनी उंबरदे गावानजीक फुटल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी किमान एक दिवस लागणार असून शहरवासीयांनी पाणीसाठ्याचा जपून वापर करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

जलवाहिनी फुटल्याचा प्रकार लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी येथे धाव घेतली. घटनास्थळी जलवाहिनी फुटल्याने सुमारे २० ते २५ फूट उंचीची उंच फवारे दूर अंतरावर उडत असल्याने जवळ जाणे शक्य होत नाही. गिरणा पंपींग यासाठी काही काळ बंद करावे लागणार आहे. जलवाहिनीचे पाणी नजीकच्या अनेक शेतात शिरले आहे . नुकसानीचा निश्चित अंदाज समजू शकणार नाही. ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने मुख्य जलवाहिनीकडे दुरुस्तीसाठी नियमित लक्ष देतानाच वारंवार गस्त घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Water Supply Disrupted Girna Pipeline Burst

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..