Nashik water crisis
sakal
नाशिक: द्वारका भागात दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याने पंचवटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असा आरोप पंचवटीतील नगरसेवकांनी केल्यानंतर सोमवार (ता.१६)पासून पाणीपुरवठा विभागाने द्वारका, काठे गल्ली भागात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर या भागातील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.