नेसू विकास परिषदेत १०० जलतारांची निर्मिती करण्याचा संकल्प

नेसू विकास परिषदेत १०० जलतारांची निर्मिती करण्याचा संकल्प
Published on: 
(टुडे पान एक मेन लिड) NSK26H35016 श्रावणी (ता. नवापूर) : नेसू विकास परिषदेप्रसंगी उपस्थित ‘योजक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे व परिसरातील शेतकरीबांधव. ---- प्रत्येक गावात शंभर जलतारा निर्मितीचा संकल्प डॉ. गजानन डांगे : शेतकऱ्यांचे खासगी मार्केट उभारण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १४ : दुष्काळी परिस्थितीत ‘जलतारा’ बंधारे उपयुक्त ठरत आहे. प्रत्येक गावात १०० जलतारा बंधारे बांधल्यास पाणी समस्येवर मात करणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० जलतारांचे प्रस्ताव दाखल करावेत. तसेच शेतकऱ्यांचे स्वत:चे खासगी मार्केट उभे करण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती ‘योजक’ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी दिली. डिसेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समीट’च्या पार्श्वभूमीवर श्रावणी (ता. नवापूर) येथे खांडबारा रुरल फार्मर प्रोड्युसिंग कंपनीत ‘नेसू परिसर विकास परिषद’ झाली. परिषदेला परिसरातील ३५ गावांमधील शेतकरी, पोलिसपाटील, सरपंच आणि नागरिक उपस्थित होते. किसन वळवी यांनी ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समीट’ दिशा स्पष्ट केली. ‘योजक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी नेसू परिसराच्या विकासातील अडचणी विशद केल्या. यंदा सातपुडा पट्ट्यात केवळ ३०० मिमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई व त्यामुळे होणाऱ्या स्थलांतराचे संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी ‘जलतारा’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक गावात जलताराविषयी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची पाच आणि सागाची पाच झाड लागवड करण्याचा संकल्प करावा. प्रत्येक गावात १०० जलतारांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे डॉ. डांगे म्हणाले. ग्रामपंचायतीमध्ये ‘नमुना नंबर ४चा फॉर्म’ भरून रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध केल्यास मजुरांचे स्थलांतर थांबेल, असा विश्वास सरपंच राजू वळवी, प्रदीप वळवी यांनी व्यक्त केला. शेतकरी हरीश चौधरी म्हणाले, की गेल्या वर्षात स्व:खर्चाने १० जलतारे स्वत:च्या शेतात तयार केले आहेत. या वेळी उपस्थित सरपंच आणि शेतकऱ्यांनी स्थानिक प्रश्न व अडचणी मांडल्या. रोबिन नाईक आणि धरमसिंग यांनी शेतीसाठी लागणारी वीज, पाणी, खते, बियाणे व विक्री व्यवस्था तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पाला गती मिळावी. देवराजसिंग पाडवी यांनी, वन हक्क जमिनी नावावर नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतीपुरक व्यवसायांवर भर द्यावा पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणारा कमी भाव यामुळे दुग्ध उत्पादक अडचणीत आला आहे. यामुळे केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता रेशीम उद्योगावर भर द्यावा. परिसरात या व्यवसायाला चांगली संधी आहे, असे राजेंद्र वसावे यानी सांगितले. भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आदी शेतीपुरक व्यवसाय सुरू केले पाहिजेत. परिसरात एकात्मिक शेती प्रयोग करण्याची गरज आहे. परिसरात नाबार्डच्या माध्यमातून आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे परिसरात फळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकेल, असे कृष्णा कोकणी यांनी सांगितले. खांडबारा विकासाचे मॉडेल बनणार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खांडबारा येथे शेतकऱ्यांचे स्वतःचे ‘खासगी मार्केट’ उभे करण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव नेण्याची संकल्पना डॉ. गजानन डांगे यांनी मांडली. खांडबरा परिसराला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येत्या तीन महिन्यांत परिसरातील १०० टक्के नागरिकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ आणि ‘किसान कार्ड’ मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी ठराव मंजूर करण्यात आला. किसन वळवी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.