थकबाकीदार संस्थांना यंदा पाणी नाही!

थकबाकीदार संस्थांना यंदा पाणी नाही!
Published on: 
थकीत पाणीपट्टीदारांना यंदा सिंचनाचे पाणी नाही! नाशिक पाटबंधारे विभागाचा निर्णय; उन्हाळी हंगामासाठी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : पाणीपट्टी थकीत असलेल्या पाणी वापर संस्थांना यंदा सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. तसेच कालवा यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्जही मंजूर केले जाणार नाहीत. नाशिक पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार उन्हाळी सिंचनाचे नियोजन करण्यात आले असून, याबाबत कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विभागाच्या कार्यक्षेत्रातील गंगापूर, गोदावरी, आळंदी, पालखेड आणि कडवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपलब्ध साठ्याला प्राधान्य देत प्रथम मंजूर उन्हाळी बारमाही पिकांना, त्यानंतर नवीन बारमाही पिकांच्या लागवडीसाठी परवानगी देण्याचे नियोजन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहापर्यंत संबंधित सिंचन शाखा कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याचे उद्दिष्ट असल्याने पाणी वापर संस्थांसह शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन विभागाने केले आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनीही पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सिंचनासाठी महत्त्वाच्या अटी - अर्जासोबत चालू वर्षाचा वैध सातबारा उतारा जोडणे आवश्यक. - ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करावा. - नियमानुसार पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार. - ऊस पिकासाठी स्वतंत्र पाणीपट्टी व अन्य आवश्यक अटी लागू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.