वणी- सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राबरोबरच निसर्ग सौदर्याने भारावलेले पर्यटनक्षेत्र आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे येथील पाणीसाठा आटत चालला आहे. त्यामुळे जंगलात पशु-पक्षी व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे..सप्तशृंगगडाच्या पायथ्यालगत असलेला सप्तशृंग घाटरस्ता, मार्कंड पिंप्री, अहिवंतवाडी, चंडिकापूर, भातोडे, मार्कंडेय बारी या सर्व बाजूने कमी-जास्त जंगल असून, येथे विविध पशू-पक्षी तसेच मोर, लांडगे, माकडे, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हे, कावळा, चिमणी, साळुंकी, फुलचुखी, रानघुबड, बगळे आदी वन्यजीवांचा वावर आहे..सप्तशृंगगडावरील बहुतांश परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असून, गडावर पशू-पक्षी मोठ्या प्रमाणात आहे. यांची तहान भागविण्यासाठी वन विभागाने नांदुरी-सप्तशृंगगड घाटातील मंकी पॉइंट, शितकडा व रडतोंडी घाटातील गणेश मंदिर परिसरात पाणवठे तयार केले आहेत. मात्र ते नावालाच असून, या पाणवठ्यात पाणीच टाकले जात नाही. .त्यामुळे ते शोभेचे बनले आहे. माकडांच्या झुंडी पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरत आहेत. काही भाविक बाटलीतून माकडांची थोडीफार तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करतात. तर काही माकडे भाविकांच्या हातातील पाण्याच्या बाटल्याही पळविण्याचे प्रकार वाढले आहे..वन्य प्राणी पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन विभाग उन्हाळ्यात जगंलात पाणवठे तयार करण्यासाठी व त्यात पाण्याची सोय करण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. गडावरील माकडे, पशू-पक्षी भाविकांच्या दृष्टीने आकर्षण असल्याने वन विभागाने जंगलवाढ, संवर्धनाबरोबरच त्यांच्यासाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यात ग्रामपंचायत, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालय, गुरुबक्षाणी रोप वे ट्रॉली कंपनीनेही गडावरील वन्यजीव, पशुपक्ष्यांच्या अन्न-पाण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.. वन विभागाचे पाणवठे नावालाच आहेत. पाणवठे गोलाकार व चार फुट खोल आहे. एक तर त्यात पाणी नसते, पाणी टाकले तर माकडे व पशू-पक्ष्यांना पाणी पिता येत नाही. वन विभागाचे पाणवठे म्हणजे ‘नसून अडचण व असून खोळंबा’ अशी गत आहे. - अजय दुबे, ग्रामस्थ, सप्तशृंगगड.गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत. दोन दिवसांतून पाणी टँकरद्वारे टाकले जाते. - दीपावली गायकवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी, कळवण.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.