कलिंगड लागवड घटल्याने नफेखोरीला लगाम

कलिंगड लागवड घटल्याने नफेखोरीला लगाम
Published on: 
टुडे पान २, कलिंगड लागवड घटल्याने नफेखोरीला लगाम मागील वर्षीची कृत्रिम टंचाई यंदा नाहीशी; बियाणे व रोपे मुबलक उपलब्ध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. त्यात मागील वेळेस काही कंपन्यांच्या कलिंगड वाणांची कृत्रीम टंचाई होती, पण यंदा कमी पाऊस व प्रतिकूल वातावरण यामुळे लागवड घटली आहे. परिणामी बियाणे विक्रीतून नफेखोरी करणाऱ्यांना फावत नसल्याने बियाणे व रोपे मुबलक किंवा अपेक्षेपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. उपलब्ध बियाणे-रोपांमुळे शेतकरी हव्या त्या वाणांची निवड करून लागवड करीत आहेत. लागवड सध्या रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा आदी भागात सुरू आहे. पण लागवडीत घट झाली आहे. कारण कलिंगडाचे उत्पादन मागील रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात कमी आले. त्यात दरही अस्थिर आहेत. तसेच अनेक भागात जानेवारीत टंचाई तयार होणार असल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. मागील वेळेस रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात वाढली होती. खरिपासह रब्बीत मोठी लागवड झाली होती. ही लागवड मागील रब्बीत नऊ हजार हेक्टर एवढी होती. यंदाची लागवड दीड हजार हेक्टर एवढीदेखील होणार नाही. जामनेरात मोठी घट कलिंगडासाठी खानदेशात जामनेर (जि.जळगाव) तालुका अग्रेसर आहे. जामनेरातील लागवड दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मिळून दोन ते अडीच हजार हेक्टरपर्यंत असते. परंतु जामनेरात टंचाई पुढे वाढू शकते. यामुळे जामनेरातील लागवड घटली आहे. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भागही कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे. परंतु अनेक शेतकरी दर अस्थिर असल्याने सावध भूमिका घेत आहेत. कारण बियाणे व किडनाशके, विद्राव्य खते पुरवठादार, एजंट चुकीची माहिती देवून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे प्रकारही मागील कालावधीत घडले आहेत. चौकट जानेवारीत काढणीचे नियोजन खानदेशातील कलिंगड लागवड कमी राहणार आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतच काढणी होईल, या दृष्टीने नियोजन केले आहे. लागवड कृत्रीम जलसाठे मुबलक असलेल्या तापी, गिरणा पट्ट्यात झाली आहे. अन्य भागात मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ५०० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड पुढील महिन्यातही काही शेतकरी करतील. लागवड आता पुढील एप्रिलपर्यंत सुरू राहील. परंतु यंदा बियाणे पुरवठादार, रोपे उत्पादकांची मनमानी, नफेखोरी बंद झाल्याचे दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.