Wedding Season Shopping: लग्नसराईच्या खरेदीने बाजारात लगबग! घागरा-चोलीला विशेष मागणी

The ongoing frenzy of women buying sarees for weddings.
The ongoing frenzy of women buying sarees for weddings.esakal

जुने नाशिक : दिवाळीनंतर आता लग्नसराईच्या खरेदीची बाजारात लगबग दिसून येत आहे.

विशेष करून महिलावर्गासाठी लागणाऱ्या साड्या, ड्रेस मटेरिअल, वधूसाठी लागणारी घागरा-चोली, तसेच पारंपरिक कपड्यांच्या दुकानांत अधिक गर्दी बघायला मिळत आहे. (Wedding Season shopping in market Special demand for ghagra choli nashik)

शुक्रवार (ता. २४)पासून लग्नसराईचा बार उडण्यास सुरवात झाली आहे. अनेकांनी निश्चित करून ठेवलेले विवाह सोहळ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. लग्नसराईस आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीस वेग आला आहे.

बाजारपेठेत विवाह सोहळे असणाऱ्या कुटुंबीयांची खरेदीसाठी लगबग होताना दिसत आहे. वर-वधूच्या कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्यांचे कपडे, आहेर अर्थात देवाण-घेवाणसाठी, मानपानाचे कपडे, वस्तू, सोन्याचे दागिने, पादत्राणे, बेन्टेक्स दागिने, बांगड्या अशा विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

यात मानपानाच्या आणि आहेर अर्थात देवाण-घेवाणसाठी लागणाऱ्या साड्यांसह वधूसाठी घागरा चोलीची विशेष मागणी होत आहे. साड्या आणि ड्रेस मटेरिअच्या दालनात अधिक गर्दी दिसत आहे. व्हॉट्सॲप कॉल करून इतरांनाही साड्यांचे प्रकार दाखविण्याचे प्रकार दुकानात अनुभवास मिळत आहेत.

बेंगलोर सिल्क, कांजीवरम, शिफॉन साड्यांसह वधूसाठी घागरा-चोली खरेदीचे प्रमाण अधिक असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. वधूसाठी शालू आणि दुल्हन साडी असायची; कालांतराने ट्रेड बदलल्याने सध्या घागरा-चोलीस मागणी होत आहे.

वर-वधूच्या कुटुंबीयांसाठी एक हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत, तर देवाण-घेवाणसाठी लागणाऱ्या साड्या ११५ पासून ते एक हजारांपर्यंत दुकानात उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तर घागरा-चोली एक हजार ५०० पासून ३० हजारांपर्यंत विक्री होत आहे.

बेंगलोर, माऊ, यूपी, सुरत, वाराणसी येथून विशेष करून सिल्क, शिफॉन यांसह विविध प्रकारच्या डिझायनेबल साड्या शहरात विक्रीस येत आहे. सुरत येथून घागरा-चोली येण्याचे प्रमाण अधिक आहे.

The ongoing frenzy of women buying sarees for weddings.
Wedding Season : लग्नाचा ‘धूमधडाका’ 27 पासून; यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

धारावाहिक, चित्रपटांची छाप

महिला वर्गाकडून दूरचित्रवाणीवर दैनंदिन धारावाहिक बघण्याचा कार्यक्रम निश्चित असतो. प्रसिद्ध धारावाहिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या नायिका, सहनाईका यांनी परिधान केलेल्या साड्या, ड्रेसचे महिलांमध्ये विशेष आकर्षण असते.

त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रपटांमधील अभिनेत्री परिधान करत असलेले कपडेही आकर्षण ठरत असतात. यंदा ‘बाई पण भारी’ चित्रपटात अभिनेत्रीने प्रदान केलेल्या साड्या महिलांचे आकर्षण ठरत आहे. त्यांची छाप यंदाच्या खरेदीवर पडली आहे.

"साड्या, ड्रेस मटेरिअल, तसेच घागरा-चोली दरांमध्ये दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. लग्नसराई सुरू झाल्याने प्रतिसाद चांगला आहे. एप्रिलपर्यंत असाच प्रतिसाद राहण्याची शक्यता आहे." - निर्मल राजपुरोहित, व्यावसायिक

The ongoing frenzy of women buying sarees for weddings.
Rajya Natya Spardha: नात्यातील सुखदुखाचा संघर्ष ‘कूस बदलताना’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com