नाशिक- जिल्हा परिषदेस २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता २० टक्के सवलतींतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहू गाडी पुरविण्यासाठी अनुदान योजना घेण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी ६ जूनपर्यंत प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांच्या शिफारसीसह संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी केले आहे.