जुने नाशिक- महापालिकेकडून दर वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. दिलेल्या सूचना केवळ कागदावरच राहतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. वर्षानुवर्षे परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही जुने नाशिकमध्ये धोकादायक वाडे बघावयास मिळत आहेत. यामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न सुटणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.