धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33794
धुळे : जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या आण्णासाहेब चुडामण पाटील दंत महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ‘व्हाइट कोट सेरेमनी’ व स्वागत समारंभाप्रसंगी उपस्थित विद्यार्थी. शेजारी मान्यवर.
--
नवोदित विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेचा वसा घ्यावा
--
डॉ. अरुण दोडामणी: धुळ्यात व्हाइट कोट सेरेमनी समारंभ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २८ : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रुग्णांप्रती जिव्हाळा, सहानुभूती ठेवून एक आदर्श डॉक्टर म्हणून काम करावे. वैद्यकीय सेवा देत असताना रुग्णांचा विश्वास जिंकावा. जवाहर मेडीकल फाउंडेशनचे हे महाविद्यालय पूर्णपणे रॅगिंगमुक्त असून, विद्यार्थी येथील शिस्त आणि नियमांचे तंतोतंत पालन करतात. यामुळेच येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी निष्णात व तज्ज्ञ डॉक्टर घडतो, असे प्रतिपादन जवाहर मेडीकल फाउंडेशनच्या आण्णासाहेब चुडामण पाटील दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी यांनी केले.
-
जवाहर मेडीकल फाउंडेशनच्या आण्णासाहेब चुडामण पाटील दंत महाविद्यालयाचे महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘व्हाइट कोट सेरेमनी’ व स्वागत समारंभाच्या सुरुवातीला डॉ. दोडामणी बोलत होते. संस्थेच्या सचिव डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी उपस्थित होते.
-
प्रा. डॉ. प्रज्ञा रेलन यांनी विद्यार्थी व पालकांना विविध विभाग आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘व्हाइट कोट’ प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. मनिष शर्मा यांनी सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायाची निष्ठा व कर्तव्याची शपथ दिली. नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे सचिव पाटील, सहसचिव पाटील आणि अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी यांनी कौतुक करत स्वागत केले.