जुने नाशिक- शहरातील रहाड संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. ६० वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली रहाड यंदा पुन्हा रंगपंचमीच्या निमित्ताने उघडण्यात आली. शिवाजी तरुण मित्रमंडळ, सती आसरादेवी संस्थेतर्फे कहार कुटुंबीयांच्या पुढाकाराने शनिवारी (ता. १५) रहाडीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून उघडी करण्यात आली. नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.