esakal | वेदनादायक! "माझ्या डोळ्यादेखत माझी पत्नी पाण्यात बुडत होती अन् मी"....
sakal

बोलून बातमी शोधा

amol ahire malegaon acc.jpg

बस हेलकावे खात असल्याचे जाणवल्यानंतर आम्ही पुढे बसलो असल्याने पूर्णपणे पाण्यात बुडालो. दैव बलबत्तर असल्याने मी हातपाय मारून कसातरी वाचलो. माझ्या डोळ्यादेखत माझी पत्नी मात्र....

वेदनादायक! "माझ्या डोळ्यादेखत माझी पत्नी पाण्यात बुडत होती अन् मी"....

sakal_logo
By
प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : "एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास' अशी शेखी मिरविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बेभान चालकाच्या अक्षम्य चुकीमुळे बसमधील निष्पाप प्रवाशांचा बळी गेला. चालकाचे मोबाईलवर संभाषण सुरू असताना, अपघाती वळणावरील गतिरोधकावर आदळलेली बस नियंत्रणात न आल्याने थेट विहिरीत कोसळल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले, अशी माहिती मेशी (ता. देवळा) येथील बस व रिक्षा यांच्या अपघातातून बचावलेल्या चिराई (ता. बागलाण) येथील अमोल अहिरे यांनी दिली. 

बसचालकाची 'एकच' चुकी...अन् निष्पाप लोकांचा मात्र.....
चिराई येथील अमोल अहिरे यांचे वडील, त्यानंतर त्यांच्या भावाच्या मोटारसायकलला अपघात झाला. यामुळे अहिरे कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला. मंगळवारी (ता. 28) पत्नीची वैद्यकीय तपासणी करून मालेगावहून कळवणला जाण्यासाठी अमोल मालेगावच्या जुन्या बस्थानकावर पोचले. एका बसमध्ये जागा न मिळाल्याने ते पुन्हा उतरून कळवण आगाराच्या बसमध्ये बसले. मात्र, बसच्या वेगामुळे अपघाताला निमंत्रण मिळाल्याचा "आँखो देखा' हाल त्यांनी "सकाळ'ला सांगितला. 

अपघातातून बचावलेल्या अमोल अहिरे यांची माहिती 

बस हेलकावे खात असल्याचे जाणवल्यानंतर आम्ही पुढे बसलो असल्याने पूर्णपणे पाण्यात बुडालो. दैव बलबत्तर असल्याने मी हातपाय मारून कसातरी वाचलो. माझ्या डोळ्यादेखत माझी पत्नी पाण्यात बुडाल्याचे दुःख आयुष्यभर बोचत राहील. अपघातानंतर आम्हाला दोन ते चार मिनिटांतच मदत मिळाली. बाहेरचा गोंगाट ऐकू येत असल्याने आम्हाला धीर मिळाला. नंतर तेथील ग्रामस्थांनी दोराच्या सहाय्याने माझ्यासह अनेकांना बाहेर काढले. तेथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिल्याचे अमोल अहिरे यांनी "सकाळ'ला सांगितले.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

पत्नी शीतलच्या अंत्यसंस्कारानंतर अमोलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात अमोलच्या बरगड्या, डावा पाय, पाठ, डावा हात आदी ठिकाणी गंभीर इजा झाली आहे. 

क्लिक करा > PHOTOS : काही समजण्याच्या आतच..तीस सेकंदात खेळ झाला...अन्‌..​

loading image
go to top