Nashik Crime: पाथर्डी फाटा परिसरातील झोपलेल्या पतीच्या डोक्यात घातली मुसळ; संशयित पत्नी, मुलाला अटक

Murder News
Murder Newsesakal

Nashik Crime : नात्यातील विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून घरात गाढ झोपलेल्या पतीच्या डोक्यात मुसळीने मारून पत्नीने खून केल्याची घटना घडली.

याप्रकरणी संशयित पत्नीसह मुलाविरोधात इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरची घटना सोमवारी (ता. १०) पहाटे पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगरमध्ये घडली. (wife hit in head of sleeping husband in Pathardi Phata Suspects wife son arrested Nashik Crime)

दादाजी पोपट गवळी (४१, रा. समृद्धी प्लाझा सोसायटी, दामोदर चौक, पाथर्डी फाटा, इंदिरानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, पत्नी सुनिता दादाजी गवळी (३७), निशांत दादाजी गवळी (२१) अशी संशयितांची नावे आहेत.

मुलगी निशा गवळी यांच्या फिर्यादीनुसार, गवळी कुटूंबिय दामोदर चौकात यशवंतनगरमध्ये समृद्धी प्लाझा सोसायटीत राहतात. दादाजी गवळी हे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये ऑपरेटर होते.

दादाजी यांचे काही वर्षांपासून शालकाच्या पत्नीसमवेत अनैतिक संबंध होते. त्यावरून गवळी कुटूंबियात वाद होत होते. नातलगांनी दोघांन अनेकदा समजही दिली होती. तरीही त्यांचे अनैतिक संबंध सुरूच असल्याचा संशय दादाजी यांच्या पत्नीला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder News
Satara Crime : मध्यरात्री डाॅक्टरच्या घरावर दरोडा; तलवारीचा धाक दाखवून लाखोंची केली लूट

याच कारणावरून संशयित सुनिता गवळी व मुलगा निशांत यांनी दादाजी गवळी यांना मारण्याचा कट रचला. त्याप्रमाणे, सोमवारी (ता.१०) पहाटे दादाजी हे घरात गाढ झोपेत असताना पत्नी सुनिता गवळी हिने त्यांच्या डोक्यात मुसळ घातली.

घाव वर्मी बसल्याने दादाजी जागीच मयत झाले. घटनेची वाच्यता झाल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयित मायलेकांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार हे तपास करीत आहेत.

Murder News
Satara Crime : मध्यरात्री डाॅक्टरच्या घरावर दरोडा; तलवारीचा धाक दाखवून लाखोंची केली लूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com