जळगाव : ट्रकच्या धडकेत पत्नी ठार; पती गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
accident
accidentsakal

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने पत्नी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शीतल शेषराव दीपके (वय ३७, रा. राधाकृष्णनगर, जळगाव, ह.मु. औरंगबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

शेषराव भिमराव दीपके पत्नी शीतल यांच्यासोबत औरंगाबाद येथे वास्तव्याला आहेत. जळगाव शहरातील राधाकृष्णनगरात त्यांची आई विमल व वडील भिमराव दीपके राहतात. अधुनमधून शेषराव व त्यांची पत्नी औरंगाबाद येथूनजळगावला आईवडिलांकडे येतात. रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनासह सलग सुट्या आल्याने शेषराव दीपके पत्नी शीतलसोबत जळगावला आईवडिलांच्या घरी आले होते. औरंगाबादला परतण्यापूर्वी भुसावळला काकूंची भेट घेण्यासाठी दीपके रविवारी (ता. १४) दुपारी अडीचला दुचाकीवरून (एमएच १०, बीडी ५००३) जळगावहून भुसावळला निघाले.

accident
जळगाव : सोशल मीडियावर महाविद्यालयाची बदनामी; सायबर पोलिसांत गुन्हा

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शीतल दुचाकीवरून खाली कोसळून ट्रकच्या चाकात आल्याने जागीच ठार झाल्या, तर शेषराव यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मृत शीतल दिपके यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून, सहाय्यक फौजदार अलीयार खान तपास करीत आहेत.

accident
जळगाव पोलिस नाशिक ‘रेंज’मध्ये तपासात अव्वल; 23 महिन्यांत 16 खुनांचा तपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com