नाशिक- विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईसह कोकण प्रदेशाव्यतिरिक्त संधी शोधण्यासाठी आणि शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ व नैराश्य झटकण्यासाठी उद्धव ठाकरे शिबिराच्या माध्यमातून उर्वरित महाराष्ट्रात खुंटे बळकट करण्यासाठी मैदानात उतरत आहेत.