धुळे ः टुडे २ साठी
---
फोटो क्रमांक ः 34940
धुळे ः अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्तीनंतर विनय गोसावी यांचा सत्कार करताना खानदेश गोसावी समाजाचे शिष्टमंडळ.
---
अपर जिल्हाधिकारी गोसावींचा
समाजातर्फे धुळ्यामध्ये सत्कार
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश
---
किंवा
अपर जिल्हाधिकारी गोसावींचा सत्कार
धुळ्यात नियुक्तीबद्दल खानदेश गोसावी समाजातर्फे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः प्रतिकूल स्थितीवर मात करून उच्च महसुली अधिकारीपदापर्यंत मजल मारणारे खानदेशचे पुत्र विनय गोसावी यांची येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर खानदेश गोसावी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात अपर जिल्हाधिकारी गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा झाला. सामान्य कुटुंबातून आणि संघर्षमय प्रवासातून प्रशासकीय सेवेच्या उच्च पदापर्यंत पोहोचल्याबद्दल उपस्थित समाजबांधवांनी श्री. गोसावी यांच्या कार्याविषयी अभिमान व्यक्त केला. हा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असून, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यशाची शिखरे गाठता येतात, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. संचालक मोहनपुरी गोसावी, अमृत गोसावी, विजय गोसावी, सुखदेव गोसावी, पुरुषोत्तम गोसावी, पी. एन. गोसावी, युवा शाखेचे उपाध्यक्ष योगेशपुरी गोसावी, शिरपूर युवा शाखेचे अध्यक्ष नितीन गोसावी, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक पंडित गोसावी, डॉ. संजय गोसावी आदी उपस्थित होते.