नाशिक- महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाइन पद्धतीने सोमवारी (ता. ७) काढण्यात आला. या लकी ड्रॉमधून पहिल्या क्रमांकाचे ६५१, तर दुसऱ्या क्रमांकासाठी एक हजार ३०२ व तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार ३०२ विजेते जाहीर करण्यात आले. विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.