फोटो-23309
सिन्नर ः प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे सागर मुंदडा यांना निवेदन देताना पदाधिकारी.
दिव्यांगांच्या रेशन बंदच्या नोटिसा मागे घ्याव्यात
प्रहार दिव्यांग संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १ ः दिव्यांग बांधवांना पुरवठा विभाग शिधापत्रिकांवरील धान्य लाभ बंद करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेने तहसील विभागाकडे केली. याबाबत नायब तहसीलदार सागर मुंदडा, पुरवठा अधिकारी विवेक जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे, जिल्हा संघटक गणपत नाठे, उपाध्यक्ष नामदेव आडके, वैभव वेलजाळे, महिला अध्यक्ष मालन आव्हाड, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष आनंद सातभाई, मुसळगाव उपाध्यक्ष चंद्रभान काकड, मनोभाव आव्हाड. गोंदे शाखाध्यक्ष रामनाथ तांबे, डॉ सावंत, दोडी अध्यक्ष बाळासाहेब पवार, अनिल आव्हाड, दिगंबर शिरसाट, मारुती लांडगे, गोरख तुपे आदी उपस्थित होते.
ज्या कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्य आयटीआर भरत असेल किंवा एखादा व्यक्ती नोकरी करत असेल अशा कुटुंबात शिधापत्रिका बंद करण्यात येणार आहे. एक व्यक्ती आयटीआर भरत असेल किंवा एक व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याचा वैयक्तिक लाभ बंद करावा, इतर सदस्यांचा धान्य लाभ सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
.............