Murder Case : साक्षीदार उलटले, मात्र फॉरेन्सिक पुराव्यांनी आरोपीला जन्मठेप

पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपीने एकावर कोयत्याने ४२ वार करीत निर्घृण खून केला
Murder Case
Murder Casesakal
Updated on

पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून रागाच्या भरात आरोपीने एकावर कोयत्याने ४२ वार करीत निर्घृण खून केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होते; परंतु न्यायालयीन खटल्यादरम्यान सारे साक्षीदार फितूर झाले. मात्र, गुन्ह्यात तपास करताना तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी बारकाईने एक-एक पुराव्यांचे संकलन केले होते. अखेर त्याच पुराव्यांच्या आधारे आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com