Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही सातपूर परिसरात राहणाऱ्या युवतीचे त्याच्यावर प्रेम जडले. त्याने गुन्हेगारी सोडण्याचे वचनही दिले. पण....
woman kidnapping

woman kidnapping

sakal

Updated on

नाशिक - गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही सातपूर परिसरात राहणाऱ्या युवतीचे त्याच्यावर प्रेम जडले. त्याने गुन्हेगारी सोडण्याचे वचनही दिले. पण, तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे कळताच तिने त्याच्याशी काडीमोड घेत माहेर गाठले. याच रागातून संशयित पतीने मध्यरात्री सासुरवाडीला येत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पत्नीला कारमध्ये बळजबरीने बसवून तिचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल असून, पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com