esakal | तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

kalpana borse 123.jpg

विवाह समारंभ आटोपून पती-पत्नी दुचाकीने जात होते. पण काळाचा दुर्दैवी फे्रा असा आला कि काही समजण्याच्या आतच सर्वकाही संपलं होते. या घटनेमुळे साळमुख वाडीचौल्हेर गावावर शोककळा पसरली आहे. काय घडले नेमके?

तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि.नाशिक) : शहरातील सुकडनाला परिसरात बुधवारी असलेला विवाह समारंभ आटोपून अजय बोरसे पत्नी कल्पना बोरसे यांच्यासह दुचाकीने जात होते. पण काळाचा दुर्दैवी फे्रा असा आला कि काही समजण्याच्या आतच सर्वकाही संपलं होते. या घटनेमुळे साळमुख वाडीचौल्हेर गावावर शोककळा पसरली आहे. काय घडले नेमके?

घटनेमुळे साळमुख वाडीचौल्हेर गावावर शोककळा

शहरातील सुकडनाला परिसरात बुधवारी असलेला विवाह समारंभ आटोपून अजय बोरसे पत्नी कल्पना बोरसे यांच्यासह दुचाकीने जात होते. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर (कै.) पं. ध. पाटीलनगरमधील वळण रस्त्याकडे जात असताना याच वेळी नाशिककडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर (पी.बी. १३, बीई ७९५२)ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी महामार्गावर जोरात पडली आणि काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या कल्पना बोरसे कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्या. त्यात त्या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती अजय बोरसे यांच्या पायास दुखापत झाली.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

कंटेनरचालकास चोप देत पोलीसांच्या ताब्यात 

अपघातानंतर पळून जात असताना कंटेनरचालकास नागरिकांनी बसस्थानकाजवळ पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे व राजेंद्र देवरे यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन कल्पना बोरसे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे तत्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविला. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

रस्त्याचे काम प्रलंबित 
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर अनेक वर्षांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्गावर आजपर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. महामार्गावर सटाणा शहराबाहेरून वळण रस्ता व्हावा, यासाठी विविध सामाजिक, पक्ष, वकील व पत्रकार संघटनांनी अनेक वेळा आंदोलने छेडली आहेत. मात्र, या रस्त्याचे काम प्रलंबित आहे.  

शहर वळण रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहरापासून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर बुधवारी (ता. २०) दुपारी अडीचला ट्रक व दुचाकी वाहनांच्या भीषण अपघातात कल्पना अजय बोरसे (वय २२) ही महिला जागीच ठार झाली. ही महिला तिळवण परिसरातील साळमुख वाडीचौल्हेर येथील रहिवासी असून, या घटनेमुळे साळमुख वाडीचौल्हेर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहर वळण रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
 

loading image
go to top