Nashik News : नांदगावजवळ धावत्या रेल्वेत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child birth

Nashik News : नांदगावजवळ धावत्या रेल्वेत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म!

नांदगाव (जि. नाशिक) : दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काशी एक्स्प्रेस नांदगाव स्थानकावरून मार्गस्थ झाली आणि आरक्षित डब्यात एकच धावपळ सुरू झाली. गाडीने न्यायडोंगरी स्थानक गाठताच बाळाचा आवाज डब्यात घुमला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

धावत्या रेल्वे गाडीमध्ये महिला प्रसूती होण्याच्या घटना नेहमीच घडतात परंतु त्यामध्ये माणुसकीचे दर्शन घडते ते अवर्णनीयच असते. (woman gave birth to cute baby in running train near Nandgaon Nashik News)

मुंबईहून मीनल व मनोज गौतम हे काशी एक्स्प्रेसने आरक्षित डब्यातून मणिपूर (उत्तरप्रदेश) येथे गावी निघाले होते. मीनल ह्या गर्भवती होत्या. नांदगाव रेल्वेस्थानक सोडल्यानंतर मीनल यांना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या.

यावेळी रेल्वे डब्यात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला धीर देण्याचा प्रयत्न केला. डब्यातील सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत होती. डब्यातील महिला नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी प्रयत्न करत होत्या कारण पुढील स्थानक चाळीसगाव येण्यासाठी वेळ होता.

यावेळी डब्यातील महिला या मीनल भोवती गोळा झाल्या आणि नैसर्गिक प्रसूती होण्याची वाट पाहू लागल्या. महिलेची नैसर्गिक सुखरूप प्रसूती व्हावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. महिलांच्या प्रयत्नामुळे अखेर...मीनल हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि डब्यातील सर्व सहप्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

चाळीसगावला वैद्यकीय मदत

काशी एक्स्प्रेस मधील तिकीट तपासणीस यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक प्रमुखांशी संपर्क साधल्यामुळे तत्काळ महिला व तिचे नवजात बालक तपासण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवली होती.

काशी एक्स्प्रेस चाळीसगाव रेल्वे स्थानकात पोचल्यानंतर या टीमने महिला व बालकाची तपासणी करत ते दोघेही सुखरूप असल्याचा निर्वाळा दिला. मात्र दोघेही सुखरूप असल्याने त्यांनी पुढे त्यांच्या गावांकडे जाण्याचा निर्णय घेत काशी एक्सप्रेसने पुढचा प्रवास सुरू केला केल्याच चाळीसगाव लोहमार्ग पोलिस हवालदार गोपाळ कृष्ण सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :Nashikchild news