Fake Account sakal
नाशिक
Fake Account : फेक अकाउंटवरून महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे
सोशल मीडियावर फेक अकाऊंट सुरू करणाऱ्या संशयिताने त्याच संस्थेच्या उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांची बदनामी केली.
नाशिक- गंगापूर रोडवरील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या नावे सोशल मीडियावर फेक अकाऊंट सुरू करणाऱ्या संशयिताने त्याच संस्थेच्या उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांची बदनामी केली आहे. तसेच, या संस्थेच्याच नावे फेक अकाऊंट सुरू करून संस्थेवरही आरोप केले आहेत. याप्रकरणी अज्ञात संशयिताविरोधात शहर सायबर पोलिसात विनयभंगाचा आयटीॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
