Nashik Bribe Crime: कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याच्या अहवालासाठी लाचेची मागणी
Labor Deputy Commissioner office
Labor Deputy Commissioner officeesakal

Nashik Bribe Crime : हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) असे लाचखोर महिला निरीक्षकाचे नाव आहे. (Woman Inspector of Labor Deputy Commissioner in arrested by ACB Nashik Bribe Crime)

कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत शहरातील आस्थापनांमध्ये शोध मोहीम राबवून बाल कामगारांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी दोन दिवसांत भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये हॉटेल व गॅरेज चालकांविरोधात बाल कामगार ठेवल्याबद्दल गुन्हे दाखल केले जात आहेत.

निशा आढाव यांनी बुधवारी (ता.१४) बाल कामगार कायद्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन गॅरेज चालकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, ४० वर्षीय हॉटेल चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आढाव यांच्याविरोधात तक्रार केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Labor Deputy Commissioner office
Jalgaon Bribe Crime : मुख्याध्यापकाने सोडली लाज; थेट चेकने घेतली लाच

या तक्रारीनुसार, आढाव यांनी मंगळवारी (ता.१३) तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये पाहणी करीत बाल कामगार आहे की नाही, याची खात्री केली. तसेच हॉटेलमध्ये बाल कामगार असल्याची बतावणी करून तपासणी अहवालात बाल कामगार नसल्याचा अहवाल पाठविण्यासह गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आढाव यांनी हॉटेल चालकाकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आढाव यांना गुरुवारी (ता. १५) कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दऱम्यान, पथकाने आढाव यांच्या घराचीही झडती घेतली.

Labor Deputy Commissioner office
Nashik Bribe Crime : लाचखोर सतीश खरेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला; एसीबीच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com