Nashik : सेल्समनला अनोळखी महिलेचा 5 लाखांना गंडा

Nashik Crime News
Nashik Crime News esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात एका इलेक्ट्रॉनिक दुकानात बसलेल्या सेल्समनला (Salesman) क्रेडिट कार्ड अपडेट (Credit Card Update) करण्याच्या बहाण्याने ओटीपी क्रमांक विचारत अनोळखी महिलेने एसबीआय क्रेडिट कार्डचा (SBI Credit Card) वापर करत पाच वेळा ट्रान्झेक्शन करून चार लाख ८२ हजार ७७८ रुपयांना गंडा घातला. खात्यावरील रक्कम कमी झालेली पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेल्समनही चक्राऊन गेला. (woman robbed salesman for Rs 5 lakh Nashik crime news)

Nashik Crime News
Nashik : मोबाईल चोर बाप- लेकांना पोलिसांकडून रेल्वेतच अटक

याप्रकरणी मोबीन अहमद मोहंमद इलियास (४०, रा. नवा आझादनगर) याने शहर पोलिस ठाण्यात अनोळखी महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. क्रेडिट कार्ड अपडेट करण्याचा बहाणा करून त्या महिलेने मोबीन अहमद यांना ओटीपी विचारला. त्यांनी ओटीपी सांगितल्यानंतर महिलेने मोबीन यांचे एसबीआयचे क्रेडिट कार्डवर पाच वेळेस व्यवहार करून चार लाख ८२ हजार रुपयांची रक्कम डेबीट करून फसवणूक केली. या महिलेने मोबीन अहमद यांच्या मोबाईलवर (९१७५०२३७१३) कॉल करून ओटीपी विचारला. संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक (९६४७५०३५१०) असा आहे. तक्रारीत श्री. अहमद यांनी हा क्रमांक नमूद केला आहे. शहर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर तपास करीत आहेत.

Nashik Crime News
Nashik Crime : 2 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे जप्त; 6 संशयितांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com