Woman allegedly strangled to death in Nashik
Sakal
पंचवटी: तपोवन परिसरातील केवडीबन येथील कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेसमोर सुटकेसमध्ये गोणीत भरलेला एका महिलेचा मृतदेह मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेआठला आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपासात संबंधित महिलेची गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.