Latest Marathi News | दिक्षी गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; यतीन कदमांनी पोलिसांना धरले धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women took the initiative and broke the bottle at the liquor store.

दिक्षी गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; यतीन कदमांनी पोलिसांना धरले धारेवर

ओझर (जि. नाशिक) : ओझर पोलिस स्टेशनच्या वतीने कारवाई केली जात नाही म्हणून, आज पुन्हा एकदा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या त्यांनी थेट अवैध दारू अडङयावर जाऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अवैधदारू गुत्यावर महिला घुसताच त्यांचा रुद्रावतार पाहून तळीरामांची पळापळ सुरू झाली. पोलीसांनी छापे मारून सुद्धा दिक्षीतील अवैध मद्यविक्री सुरूच होती. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेत दारू अड्ड्यावर बाटली फोडो आंदोलन केले. (Women Aggressive for Prohibition of Liquor in Dikshi Village Nashik Latest Marathi News)

यावेळी भाजपचे यतीन कदम देखील अवैध दारू अड्डा बंद करण्यासाठी रास्ता रोको मध्ये महिलांसोबत उतरले व गेल्या महिन्यापासून महिलांच्या वतीने दिक्षीतील महिला शाळकरी मुले व शेतावर काम करणारे व्यसनाधिन होत असल्याने आंदोलन केले जात आहे. 'तुम्हाला बंदोबस्त का करता येत नाही?' असा जाब आंदोलनकर्त्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद यतीन कदम यांनी पोलिसांना विचारून धारेवर धरले.

टॅग्स :Nashikwomenliquor ban