नवरात्रीनिमित्त ‘सह्याद्री फार्म्स’कडून शेतीतल्या महिलाशक्तीचा सन्मान:

नवरात्रीनिमित्त ‘सह्याद्री फार्म्स’कडून शेतीतल्या महिलाशक्तीचा सन्मान:
Published on: 
LKH26B05110-- हा फोटो फक्त सिंगल घेणे. -------------------- शेतीतल्या महिलाशक्तीच्या सन्मानाची अनोखी मालिका ‘सह्याद्री फार्म्स’कडून नवरात्रीनिमित्त आयोजन सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता.१० ः शेतीतील महिलांचे बहुमोल योगदान लक्षात घेऊन ‘सह्याद्री फार्म्स’कडून दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. या उपक्रमाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून ११ ऑक्टोबरपासून ही विशेष मालिका प्रसारित होणार आहे. यंदाच्या मालिकेची थीम अतिशय महत्त्वाची आणि सामूहिक शेतीचा किंवा संघटित शेतीचा संदेश देणारी आहे. ‘एकटे असताना आपण फक्त पिके उगवतो, पण एकत्र आल्यावर आपण सुरक्षित अन्न आणि समृद्धी उगवतो’ या थीम अंतर्गत सामूहिक शेतीच्या माध्यमातून महिला करत असलेल्या उल्लेखनीय कामाचा आणि सहकार्याचा वेध घेतला जाणार आहे. यंदाच्या मालिकेत महिलांच्या नेतृत्वाखालील सामूहिक शेतीची ताकद, त्यातून निर्माण होणारे सुरक्षित अन्न आणि सर्वांची मिळून होणारी समृद्धी यावर विशेष भर दिला जाणार आहे. ही मालिका ‘सह्याद्री फार्म्स’च्या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून रोज एक याप्रमाणे प्रसारित केली जाईल. मालिकेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com