धुळे : टुडे पान २ साठी...मेन
--
35160
साक्री : ''उमेद’ अभियानांतर्गत पंचायत समिती आवारात दिवाळीनिमित्त लावण्यात आलेल्या महिला बचतगटांच्या स्टॉलवर फराळाची खरेदी करताना महिला.
--
‘उमेद’च्या माध्यमातून १७ लाखांहून अधिकची उलाढाल
दिवाळीत बचतगटांच्या अर्थकारणाला झळाळी ; फराळासह हस्तकलेच्या वस्तूंना प्रतिसाद
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : सण-समारंभांच्या हंगामात हंगामी व्यवसायांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेल्या महिला बचत गटांनी यंदाच्या दिवाळीतही आपल्या मेहनतीची आणि कौशल्याची छाप सोडली आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. यात दिवाळीत जिल्ह्यात एकूण १७ लाख ६८ हजार ४१० रुपयांची उलाढाल नोंदवली गेली.
यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक फराळासह आकर्षक आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या आणि हस्तकलेच्या वस्तूंना बाजारात मागणी होती. देवघरातील पूजेच्या साहित्यापासून ते फराळाच्या डब्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये बचत गटाच्या उत्पादनांनी आपले हक्काचे स्थान निर्माण केले. पंचायत समिती परिसर, मुख्य बाजारपेठा आणि बसस्थानकांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी हे स्टॉल उभे करण्यात आले होते. घरगुती स्वरूपात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या या महिला उद्योजिकांनी या माध्यमातून लाखांची आर्थिक उलाढाल करत आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला.
-
फराळाला पसंती
या स्टॉलवर लक्ष्मीच्या मूर्ती, आकर्षक दिवे, तोरण, फटाके, फरसाण तसेच चिवडा, लाडू, करंजी, शेव, चकली आणि अनारसे यांसारखे पारंपरिक फराळाचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन सणासुदीच्या काळात स्थानिक बाजारपेठेत व्यवसायाची संधी निर्माण केली आहे. हा दिवाळी महोत्सव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला. ‘उमेद’चे प्रभारी जिल्हा अभियान व्यवस्थापक लोकेश सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक उद्धव धारणे, जिल्हा व्यवस्थापक जितेंद्र चौधरी, दीपाली पाटील, विशाल मोरे यांनी नियोजन केले. तालुकास्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक राजेंद्र पाटील, ईश्वर पाटील, रामचंद्र पाटील, संदीप पाटील यांच्यासह सर्व तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
१७ लाखांची उलाढाल
‘उमेद’ अभियानांतर्गत बचत गटांनी तालुकानिहाय ७७ स्टॉल विक्रीसाठी थाटले होते. यात शिरपूर तालुक्यात १० स्टॉलमधून सहा लाख ६७ हजार ५०० रुपयांची सर्वाधिक विक्री झाली. शिंदखेडा तालुक्यात १६ स्टॉलमधून पाच लाख ८५ हजार रुपयांची उलाढाल झाली. धुळे तालुक्यात ४२ स्टॉलमधून दोन लाख ७० हजार ९१० रुपये आणि साक्री तालुक्यात नऊ स्टॉलमधून दोन लाख ४५ हजार रुपयांची उलाढाल नोंदवली गेली.