सुरक्षित हवाई प्रवासासाठी नारीशक्ती सदैव तत्पर!

सुरक्षित हवाई प्रवासासाठी नारीशक्ती सदैव तत्पर!
Published on: 
लोगो : आम्ही साऱ्याजणी जळगाव विमानतळ --- NSK26H31897 (फोटो चार, पाच कॉलम वापरावा) जळगाव : ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमात सहभागी विमानतळावरील विविध विभागातील तसेच विमान कंपनीच्या महिला कर्मचारी. ........... सुरक्षित हवाई प्रवासासाठी नारीशक्ती सदैव तत्पर नवरात्रोत्सवानिमित्त जळगाव विमानतळावरील कर्तृत्ववान महिलांशी संवाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : विमानतळावरील प्रवाशांची सुरक्षा, सामानाची तपासणी, तिकीट पडताळणी, बोर्डिंग पास देणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जळगाव विमानतळावरील महिला कर्मचारी समर्थपणे पार पाडत आहेत. प्रसंगी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जात, भाषेच्या अडचणींवर मात करत त्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रयत्नशील असतात. कर्तव्यनिष्ठा, कौशल्य आणि संयमाच्या बळावर विमानतळाच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या नारीशक्तीच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवानिमित्त साधलेल्या संवादातून समोर आला. यावेळी विमानतळ संचालक हर्षकुमार त्रिपाठी उपस्थित होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हसीना तडवी (पोलिस कर्मचारी) : विमानतळावर दररोज शंभरहून अधिक महिला प्रवाशांची तपासणी केली जाते. या वेळी काही अडचणी निर्माण झाल्या, तरी वरिष्ठ अधिकारी आणि विमानतळ प्रशासनाच्या मदतीने त्या सोडविल्या जातात. विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुरक्षेच्या नियमांशी तडजोड नाही अंकिता खिच्छी (विमान सुरक्षा कर्मचारी, अलायन्स एअर) : गेल्या वर्षभरापासून जळगाव विमानतळावर कार्यरत आहे. विमानाची सुरक्षा, सामानाची तपासणी आणि प्रतिबंधित वस्तू नेण्यास मनाई करणे, ही प्रमुख कामे आहेत. काही वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सामानाच्या तपासणीत अडचणी येतात; मात्र, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन आवश्यक आहे. प्रत्येक तपासणी महत्त्वाची दिशा गुप्ता (विमान सुरक्षा कर्मचारी, फ्लाय ९१) : तिकीट आरक्षित केलेली व्यक्ती आणि प्रत्यक्ष प्रवास करणारी व्यक्ती एकच आहे का, याची खात्री करण्यासह सामानाची तपासणी केली जाते. प्रवाशांसोबत काही वेळा मतभेद होतात; मात्र, संवाद आणि सामंजस्यातून मार्ग काढत सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाते. प्रवाशांना मार्गदर्शन वैष्णवी क्षीरसागर (वाणिज्य विभाग कार्यकारी, फ्लाय ९१) : प्रवाशांना बोर्डिंग पास देणे, सामानाचे वजन करणे आणि ते व्यवस्थित बंद असल्याची खात्री करणे, ही कामे करावी लागतात. अनेक प्रवासी, विशेषतः शेतकरी, पहिल्यांदाच विमानप्रवास करतात. त्यांना प्रक्रिया समजावून सांगून मदत करण्यात समाधान मिळते. संयम महत्त्वाचा प्रीतिका बिरणवारे (वाणिज्य विभाग कार्यकारी) : पुणे विमानतळावर कामाचा अनुभव असल्याने अडचणी कमी येतात. मात्र, विमान उशिरा आल्यास किंवा तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्यास प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. अशा वेळी संयमाने परिस्थिती समजावून सांगणे महत्त्वाचे असते. प्रवाशांशी सहजसोपा संवाद स्नेहा कोंडके (वाणिज्य विभाग कार्यकारी) : तिकिटांची पडताळणी, ओळखपत्र तपासणे आणि बोर्डिंग पास देण्यासह पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. प्रवाशांना त्यांच्या भाषेत माहिती दिल्यास प्रक्रिया समजणे सोपे होते. संवादकौशल्याचा उपयोग सुषमा ठोंबरे (वाणिज्य विभाग कार्यकारी) : प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष कामात प्रत्येकाची गरज लक्षात घेऊन संवाद साधावा लागतो. तिकीट, बोर्डिंग पास आणि सामानाच्या प्रक्रियेत प्रवाशांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. भाषेच्या अडचणींवर मात प्राची शुक्ला (वाणिज्य विभाग कार्यकारी) : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर कामाचा अनुभव आहे. जळगाव विमानतळावर मराठी आणि खानदेशी भाषा समजून घेताना काही वेळा अडचणी येतात. मात्र, स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने मार्ग काढता येतो. कमी जागेतही येथे चांगल्या सुविधा दिल्या जातात. ओळखपत्र व्यवस्थापनातून सुरक्षेला बळ निकिता चौधरी (कार्यालयीन अधिकारी सहाय्यक) : विमानतळावरील नियमित व कंत्राटी कर्मचारी, कॅन्टीन कर्मचारी तसेच वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांची ओळखपत्रे, प्रवेशपत्रे आणि नूतनीकरणाची जबाबदारी सांभाळते. अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश मिळतो का, याची खात्री करणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विमानतळाच्या कामकाजाचे नियोजन पूनम पाटील (विमानतळ संचालक सहाय्यक) : विमानतळाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती संकलित करणे, बैठकींचे नियोजन करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, ही माझी प्रमुख कामे आहेत. सहकाऱ्यांच्या मदतीमुळे कामकाज सुरळीत पार पडते. मर्यादित जागेत प्रवाशांना उत्तम सुविधा पूजा महाजन (विमानतळ इमारत व्यवस्थापक) विमानतळाच्या इमारतीतील सुविधा चांगल्या स्थितीत ठेवणे आणि प्रवाशांच्या सूचना व अभिप्रायानुसार सुधारणा करणे, यावर भर असतो. उपलब्ध जागेचा योग्य वापर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रशिक्षणातून कामकाजाचा अनुभव साक्षी शर्मा (प्रशिक्षणार्थी, विद्यार्थिनी) : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना जळगाव विमानतळावर प्रशिक्षणाची संधी मिळाली. गेल्या दीड ते दोन महिन्यांत विमानाच्या जमिनीवरील तपासणीसह हवाई वाहतूक नियंत्रण विभागातील (एटीसी) संदेशवहन प्रक्रियेचे ज्ञान मिळाले. विमानतळ संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनातून प्रत्यक्ष कामकाज शिकण्याची संधी मिळत आहे. ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com