KPD26B13557
तरवाडे : महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार राम भदाणे, प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले आदी.
----------
शेतकरी महिला प्रमाणपत्र
एक महत्वाकांक्षी कार्यक्रम
आमदार राम भदाणे : देवभानेत महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २६ : धुळे तालुक्यात महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेवून, महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची धुळे ग्रामीणमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.
आमदार राम भदाणे यांनी सांगितले, शेतीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या माता- भगिनींच्या हातात अधिकार आणि आत्मविश्वासाचे बळ देणारा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात आले असून, प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना अधिकृत ओळख मिळाली आहे. देवभाने (ता. धुळे) येथे आमदार भदाणे यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे गणेश अग्रवाल, दगडू वंजारी, राजेंद्र काकडे आदींनी संयोजन केले.