धुळे : टुडे पान १ साठी.. सेकंड मेन
--
फोटो क्रमांक : 32909
धुळे : महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शनात उपस्थित महिला शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते. शेजारी डॉ. दिनेश नांद्रे, सुरज जगताप, डॉ. गिरीश पाटील, डॉ. जयेश बलकटे, अजय फडोळ आदी.
--
महिला शेतकरी हाच शेतीचा मुख्य कणा
--
पालकमंत्री जयकुमार रावल : धुळ्यात महिला शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : सकाळी घरातील कामे आटोपून शेताची वाट धरणारी, उन्हातान्हात पेरणीपासून निंदणी, कोळपणीपर्यंत राबणारी आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी महिला हीच खऱ्या अर्थाने शेतीचा मुख्य कणा आहे. कुटुंबावर संकट आले तरी हिंमत न हारता सावरण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. त्यामुळे केवळ त्यांचा गौरव न करता त्यांना समान संधी, आर्थिक स्वावलंबन आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विभाग, आत्मा (धुळे) आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिरे भवन येथे झालेल्या महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. जयेश बलकटे, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व महिला शेतकरी उपस्थित होत्या. मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे मार्गदर्शन करण्यात आले.
-
रोजगाराच्या संधी
आमदार गावित म्हणाल्या, की महिला बचत गटांनी प्रामाणिक कर्जफेडीतून बँकांचा विश्वास संपादन केला आहे. महिलांनी ‘शेतकरी महिला प्रमाणपत्र’ मिळवून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा. लखपती दीदी व ड्रोन दीदी योजनांतून शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
प्रशासनाकडून प्रत्यक्ष बदलाचा मानस
जिल्हाधिकारी विसपुते म्हणाल्या, की महिलांचा सन्मान केवळ सत्कार व प्रमाणपत्रांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल झाला पाहिजे. आयुष्मान भारत कार्ड, ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आणि शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. महिलांशी मोकळ्या संवादासाठी ‘डबा पार्टी’सारखा उपक्रम घेणार असल्याचे सांगत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.