नोकरीच्या पलीकडे जाऊन शेतीच्या बांधावरून महिला सक्षमीकरणाचा जागर

नोकरीच्या पलीकडे जाऊन शेतीच्या बांधावरून महिला सक्षमीकरणाचा जागर
Published on: 
पान-२ साठी-- सदर सन्मान तीच्या कर्तृत्वाचा----लोगो ---------- YEO26B27159 महिला शेतकऱ्यांना निंबोळी अर्काबाबत माहिती देताना सोनाली कदम. ---------- ३०-२ नोकरीच्या पलीकडे बांधावर जात महिलांचे सक्षमीकरण ----------- सोनाली कदम यांची धडपड प्रेरणादायी, शाश्वत शेतीसाठी ----------- संतोष विंचू , येवला शे ती म्हणजे केवळ पीक उत्पादन आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी नव्हे, तर महिलांच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाची पेरणी करणारे प्रभावी माध्यम आहे. याच विचारातून कृषी विभागाच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन महिला सक्षमीकरण, विषमुक्त शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली कदम यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. येवला येथे कार्यरत असलेल्या कदम महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान देण्यासोबतच घरच्या घरी जैविक निविष्ठा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. महिला शेतीशाळा, कृषी प्रदर्शन दौरे आणि शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून जीवामृत, दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण दिले. यामुळे महिलांची शेतीविषयक क्षमता वाढण्यासह उत्पादन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळत आहे. महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी सातत्याने महिला शेतीशाळा, कृषी प्रदर्शन दौरे आणि शिवार फेऱ्यांचे आयोजन करून जैविक निविष्ठा (जीवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क) महिलांना घरच्या घरी सहज तयार करता याव्यात यासाठी गावपातळीवर प्रात्यक्षिकांसह विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करतात. ​पर्यावरण पूरक शेती आणि वृक्षसंवर्धनासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ''एक झाड तिचे'' या विशेष उपक्रमातून शेकडो झाडांची लागवड केली आहे. समाजातील उपेक्षित आणि कष्टाळू एकल, विधवा महिला शेतकऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात येतो. १६-१ ''मिलेट्स किचन'', डिजिटल विस्तार तृणधान्याचा आहारात समावेश व्हावा यासाठी सौ. कदम यांनी ''मिलेट्स किचन'' हे पुस्तक लिहिले, त्याचे प्रकाशन जिल्हाधिकारींच्या हस्ते झाले. ''शेती आणि शेतकरी'' युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, वृत्तपत्रीय लेखमाला आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून जोडले आहे.​ या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ''जिल्हास्तरीय उत्कृष्ट कृषी विस्तारक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ------------------- कोट----YEO26B27161 वृक्षलागवडीबाबत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आंबा वृक्षांच्या कलमांची वाण म्हणून भेट देऊन प्रत्यक्ष लागवड करून घेतली आहे. महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणि सन्मान मिळवून देणे, महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये आत्मनिर्भर बनविणे हाच माझा खरा ध्यास आहे. - सोनाली कदम, सहाय्यक कृषी अधिकारी, येवला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com