धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H32974
धुळे : जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त महिला रुग्णालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. समीर शेख व इतर मान्यवर, महिला.
--
रजोनिवृत्तीच्या काळात
महिलांनी काळजी घ्यावी
---
जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त महिला रुग्णालयात जागृती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त रविवारी (ता.१८) महिला रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम झाला. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मान्यवर डॉक्टरांनी केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी डॉ. सोनवणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका पाटील यांनी रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक समस्या आणि आरोग्य जपण्याच्या उपायांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. समीर शेख, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिनेश दहिते, डॉ. हेमंत चौधरी, डॉ. गीतांजली सोनवणे, सहायक अधिसेविका सरला शिंदे, बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका प्रतिभा घोडके, अमरजीत पवार, पंकज काळे, मेघश्याम घोलप, शर्मिला वसावे, रुमा गावित, भारती सानप, शीतल थोरात, प्रतीक्षा गवांदे यांच्यासह परिचारिका प्रशिक्षणार्थी आणि रुग्णालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
---