धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 32775, 32776
धुळे : दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी श्री एकवीरादेवीला ४०१ फुटांची चुनरी अर्पणासाठी पदयात्रेत सहभागी भाजप महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि विद्यार्थिनी. दुसऱ्या छायाचित्रात महाआरती करताना अल्पा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी व महिला पदाधिकारी.
--
दुष्काळमुक्तीसाठी एकवीरादेवीला ४०१ फुटांची चुनरी
--
धुळ्यात भाजप महिला आघाडीची पदयात्रा; मंदिरात महाआरतीतून सामुहिक साकडे
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, बळीराजाला दिलासा देत सुख-समृद्धी लाभावी आणि राज्यात पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी शनिवारी (ता. १७) खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरदेवीला ४०१ फुटांची चुनरी अर्पण करून साकडे घालण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाव- बेटी पढाव’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्या नेतृत्वात सकाळी साडेआठला आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिरापासून श्री एकवीरादेवी मंदिरापर्यंत चुनरी पदयात्रा काढण्यात आली.
-
महापौर परदेशी, अल्पा अग्रवाल, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महापालिकेच्या स्थायी सभापती लताबाई पोतदार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, भाजप महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस जयश्री अहिरराव, महिला महानगर जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका कुंतल अग्रवाल, नगरसेविका कल्याणी अंपळकर, कल्पना महाले, प्रतिभा चौधरी, डॉ. निशा महाजन, प्रभावती शिंदे, योगिता कुटे, वंदना भामरे, वैभवी दुसाने, उज्ज्वला भोसले, संध्या कदम, रूपाली पाटील, शीतल वाघ, पुष्पा पवार, मोहिनी धात्रक, मोहिनी गौड, शीतल बोरसे, सोनल नांद्रे, सोनल बैरागी, काजल नेमाने, मंजुषा नेमाने, पूर्वा अग्रवाल, नीलू अहिरे, सरला अहिरे, पायल अग्रवाल, श्रेया अग्रवाल, खुशी गुप्ता, सारिका अग्रवाल, नीतू अग्रवाल, अमोल अग्रवाल, प्रथमेश गांधी, नगरसेवक नागसेन बोरसे, कमलेश देवरे, पवन मराठे आदी सहभागी झाले. पदयात्रेत महाराणा प्रताप विद्यालय, परिवर्तन हायस्कूल, अभिजित ठाकरे विद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय आणि कमलाबाई अजमेरा विद्यालयातील विद्यार्थिनींसह डॉ. के. डी. अरगडे, मनोहर चौधरी, स्मिता अजमेरा यांच्यासह शिक्षक- शिक्षिका उपस्थित होत्या.
-
१४-१
..चौकट..
१४-१
एकवीरादेवीचा जयजयकार
वाद्यांच्या गजरात आणि श्री एकवीरादेवीच्या जयजयकारात महिला पदाधिकारी व विद्यार्थिनींनी ४०१ फुटांची चुनरी हाती धरून पदयात्रा काढली. चौकाचौकांत महिलांनी गरब्याचा फेर धरला, तर विद्यार्थिनींनी पाण्याच्या बचतीचे संदेश देणारे प्रबोधनात्मक फलक झळकवले. पदयात्रा श्री एकवीरादेवी मंदिरात पोहोचल्यानंतर ४०१ फुटांची चुनरी अर्पण करून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. उपस्थितांनी वरुणराजाची कृपा होऊन रानशिवार हिरवेगार व्हावे, अशी प्रार्थना केली. या उपक्रमासाठी श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव व पुजाऱ्यांनी सहकार्य केले.