कुटुंब-प्रशासनाचा ताळमेळ साधत लोकाभिमुख कामाला प्राधान्य’

कुटुंब-प्रशासनाचा ताळमेळ साधत लोकाभिमुख कामाला प्राधान्य’
Published on: 
टुडे ३ मेन फिचर लोगो- ‘आम्ही साऱ्या जणी’ NSK26H32661 जळगाव : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, निर्मला गायकवाड, आस्थापना अधीक्षक अनुभा भट, एनयूएलएम विभागप्रमुख गायत्री पाटील, पचंशीला इंगळे, दीपाली खाचणे, संगीता शिरसाळे, सुजाता पाटील, प्रणाली दुसाने, आशा चौधरी. --- कुटुंब-प्रशासनाचा ताळमेळ साधत लोकाभिमुख कामाला प्राधान्य जळगाव महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कर्तव्यनिष्ठेचा प्रवास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : घर आणि कार्यालयातील जबाबदाऱ्यांचा समतोल साधत नागरिकांच्या समस्या सोडविणे, नागरी सुविधा सक्षम करणे आणि प्रशासकीय कामकाज गतिमान ठेवणे, हेच महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, महसूल, स्वच्छता, महिला व बालकल्याण अशा विविध विभागांत काम करताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, नियोजन, अनुभव आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यापासून ते वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यापर्यंत त्यांच्या कामाची व्याप्ती आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘आम्ही साऱ्या जणी’ या उपक्रमातून महापालिकेच्या विविध विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. .... लोकाभिमुख प्रशासनावर भर शोभा बाविस्कर (अतिरिक्त आयुक्त) : ११ नोव्हेंबर २००८ रोजी प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर नवापूर नगरपरिषदेत पहिली नियुक्ती मिळाली. त्यानंतर जामनेर, पाचोरा आणि धुळे येथे काम करण्याची संधी मिळाली. नोव्हेंबर २०२५ पासून जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहे. पाणीपुरवठा, बांधकाम आणि विद्युत विभागांची जबाबदारी सांभाळताना नागरिकांच्या तक्रारी तळागाळापासून ते अधिकारी स्तरापर्यंत सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कुटुंब आणि प्रशासकीय कामकाजाचा समतोल साधत लोकाभिमुख प्रशासन राबविण्यावर भर असतो. .... मूलभूत प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य निर्मला गायकवाड (उपायुक्त, आरोग्य विभाग) : २००९ मध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर भगूर नगरपालिका, नाशिक महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला. जळगाव महापालिकेत उपायुक्त म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळताना शहरातील स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी आणि अडचणी सोडविण्यावर भर असतो. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. --- मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न धनश्री शिंदे (उपायुक्त, महसूल विभाग) २०१३ पासून प्रशासकीय सेवेत कार्यरत असून, यवतमाळ, वसई-विरार महापालिका आणि अन्य ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. नागरी सुविधा, विविध दाखले आणि तक्रारींच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा महापालिकेशी संबंध येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मालमत्ताकर वसुली, न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावणे आणि महापालिकेच्या मालमत्तांमधून उत्पन्न वाढविणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. .... वंचित घटकांसाठी सेवाकार्य गायत्री पाटील (एनयूएलएम विभाग प्रमुख) : समाजकार्याचे शिक्षण घेतले असून, २०१५ पासून महापालिकेच्या एनयूएलएम विभागात कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून बेघर व्यक्ती, भिक्षेकरी आणि महिला बचत गटांतील महिलांसोबत काम करण्याची संधी मिळते. बेघर व्यक्ती व भिक्षेकऱ्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ... प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यावर भर अनुभा भट (आस्थापना विभाग अधीक्षक) : १९९२ मध्ये नगरपालिकेत रुजू झाल्यानंतर विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाली. सध्या आस्थापना विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावण्याला गती दिली आहे. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या लाभाची प्रकरणे निकाली काढून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ... नियोजनातून कामात सुसूत्रता पंचशील इंगळे (लिपिक) : १९९८ पासून महापालिकेत कार्यरत असून, विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाली आहे. जन्म-मृत्यू विभाग, त्यासंबंधित न्यायालयीन प्रकरणे, आपत्कालीन कक्ष आणि अन्य विभागांतील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. कधी कामाचा ताण वाढतो; मात्र, नियोजन आणि अनुभवाच्या जोरावर त्यावर मात करून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतात. ......... कामकाजात अचूकता महत्त्वाची दीपाली खाचणे (लिपीक) : बीएस्सी आणि बीकॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी संस्थेत शिक्षिका म्हणून काम केले. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत रुजू झाले. सध्या करवसुली विभागात शहरातील स्थावर मालमत्ता, महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचे नूतनीकरण आणि करारांसंबंधित कामांची जबाबदारी सांभाळत आहे. अचूक माहितीच्या आधारे कामकाज पूर्ण करण्यावर भर असतो. .... विविध विभागांत काम करण्याची संधी संगीता शिरसाळे (लिपीक) : शासकीय सेवेत रुजू होण्यापासून ते शिक्षण पूर्ण करण्यापर्यंत पतीची मोलाची साथ मिळाली. २०१२ पासून महापालिकेत कार्यरत असून, विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाली आहे. कुटुंब आणि घर सांभाळताना जसे नियोजन करावे लागते, तसेच नियोजन कार्यालयीन कामकाजातही उपयोगी पडते. ... बारनिशी विभागातून समन्वय सुलभ सुजाता पाटील (लिपीक) : १९९७ पासून महापालिकेत कार्यरत आहे. सध्या बारनिशी विभागात काम करताना सर्व विभागांशी दैनंदिन संपर्क येतो. विविध निवेदने, तक्रारी आणि अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. पूर्वानुभवामुळे कामाचे स्वरूप समजून घेणे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधणे सोपे होते. ... लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचविण्याचे कार्य प्रगती दुसाने (लिपीक) : महिला व बालकल्याण विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे. दिव्यांग विभाग, बालवाड्या आणि शाळांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळते. यासोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींची स्वीय सहायक म्हणूनही काम पाहते. दिव्यांग व्यक्तींपर्यंत अनुदान आणि विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ...'' बचतगटांतील महिलांना प्रोत्साहन आशा चौधरी (समुदय संघटक) : १९९४ पासून महापालिकेच्या एनयूएलएम विभागात महिला बचत गटांसाठी काम करत आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटी पदावर कार्यरत असून, शहरातील सुमारे २७०० महिला बचत गटांशी संबंधित कामकाज सांभाळते. अनेक गटांतील महिलांशी नियमित संपर्क ठेवणे हे आव्हानात्मक असते. काही वेळा बचत गटांतील महिलांच्या कौटुंबिक समस्या आणि वाद सोडविण्यासाठीही मदत करावी लागते. ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com