Women's Reservation: देर आये दुरुस्त आये....महिला संघटनांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

Women Reservation Bill
Women Reservation Billesakal

Women's Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थेपाठोपाठ आता लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर महिलांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

सर्वच राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक बदलांविषयी मत मांडले. विधेयकामुळे महिलांच्या राजकीय प्रवास अधिक सुखकर होईल.

हे यापूर्वीच घडायला हवे होते पण ‘देर आये दुरुस्त आये’ अशा स्वरूपाच्या भावना ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी व्यक्त केल्या. (Women Reservation bill passed Women organizations welcome Central Government decision nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

"लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण मिळणे ही आनंदाची बाब आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करून महिलांना न्याय दिला. ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करते." - प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)

"देशाच्या राजकारणात महिलांना हक्काचे स्थान देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांती घडवली आहे. विधानसभा व लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यास निर्णयाचा निश्चितपणे फायदा होईल. निर्णयाचे स्वागत करते."-अमृता पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप, महिला आघाडी

"महिला आरक्षणाचे विधेयक काँग्रेस सरकारने सर्वप्रथम मांडले होते. तेव्हाच राजकीय पक्षांनी आपले मन मोठे केले असते तर आज महिला प्रतिनिधींची संख्या वाढली असती. पण ‘देर आये दुरुस्त आये. निर्णयाचा अधिक आनंद झाला."- स्वाती जाधव, शहराध्यक्ष, काँग्रेस

"शरद पवार साहेबांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाकडे बघून महिलांना लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण दिल्याचा आनंद वाटतो."- अनिता दामले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट

Women Reservation Bill
Women Reservation Bill : महिलांना पहिल्यांदा आरक्षण कोणी दिलं? अमित शाहांचं काँग्रेसला लोकसभेत प्रत्युत्तर

"महिलांना राजकारणात संधी मिळावी, यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यामुळे निर्णयाचे आम्ही स्वागत करतो."

-मंगला भास्कर, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट, महिला आघाडी

"महिलांना राजकारणात हक्काचे स्थान देण्याचा स्वागताहार्य निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील महिला सक्षमीकरणावर भर राहिला आहे. त्यामुळे निर्णयाचे जोरदार स्वागत करते."

-सुवर्णा मटाले, महिला आघाडी प्रमुख, शिवसेना शिंदे गट

"महिलांना लोकसभा व विधानसभेची द्वारे खुली करून केंद्र सरकारने महिलांचा सन्मान वाढवला आहे. निर्णयाचे स्वागत करते. त्याची अंमलबजावणी लवकर व्हायला हवी."

- सुजाता डेरे, शहराध्यक्ष, मनसे, महिला आघाडी

Women Reservation Bill
Women's Reservation : "पुरूष नेते पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून..."; महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com