International Women's Day: मनमाडला पोलिस ठाण्यात महिला राज! महिला दिनानिमित्त सांभाळली पूर्ण जबाबदारी

Women police personnel in charge of Manmad Police Station on the occasion of International Women's Day.
Women police personnel in charge of Manmad Police Station on the occasion of International Women's Day.esakal

मनमाड (जि. नाशिक) : कोणी कारकून, कोणी गोपनीय, कोणी ठाणे अंमलदार तर कोणी क्राईम असे विविध विभाग जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस ठाण्यातील महिलांनी यशस्वीपणे सांभाळली.

यामुळे मनमाड पोलिस ठाण्यात महिलाराज अवतरले होते. महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

मनमाड पोलिस ठाण्यात एका वेगळ्या उपक्रमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेसह ठाण्याची संपूर्ण जबाबदारी ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे सांभाळली.

प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ठाणे अंमलदार एम.एस.बिडगर व महिला कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे दिवसभर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Women police personnel in charge of Manmad Police Station on the occasion of International Women's Day.
Crop Crisis : वांगी पिकावर फिरवला रोटर; बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हताश

प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच मनमाड पोलिस ठाण्यात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठाण्याचा कारभार हाती घेतला होता.

प्रभारी अधिकारी आर.टी.बांगर, ठाणे अंमलदार एम.एस.बिडगर, एस.बी.गवांदे, एस.ए.वाटपाडे, एम.एम.उंबरे यांनी ठाण्याचा प्रभार हाती घेऊन कामाला सुरवात केली. महिला कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली. पोलिस कर्मचारी सुनील पवार, गणेश नरोटे, संदीप वणवे, संदीप झाल्टे, मुद्दसर शेख, आदींनी दिवसभराच्या कामकाजात सहभाग घेतला. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Women police personnel in charge of Manmad Police Station on the occasion of International Women's Day.
Womens Day 2023 : सामान्य महिलाच पोस्टाच्या खऱ्या ग्राहक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com