नाशिक - दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच चर्चेला येतो आहे. शहरातील महिलांच्या संबंधित चार गुन्हे दाखल झाले असून, यातील दोन गुन्ह्यात पीडितांचा विनयभंग करण्यात आला आहे. तर एका घटनेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. एका घटनेत तर पतीनेच छळ करीत शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.