थेंबभर पाण्यासाठी हिरावाडीतील महिलांची वणवण | Nashik

Women suffering due to Low pressure water supply in Hirawadi area nashik News
Women suffering due to Low pressure water supply in Hirawadi area nashik Newsesakal

पंचवटी (जि. नाशिक) : हिरावाडी परिसरातील महिला पाण्याच्या कमी दाबामुळे (Low water pressure) त्रस्त आहेत. प्रशासनाने पाणी वाटपात अघोषित कपात केली आहे का, असा प्रश्‍न माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी उपस्थित केला आहे. पंचवटी गावठाण भागातही अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

भावसंगम ठक्कर रो हाऊसेस, भगवतीनगर, शक्तिनगर, दीपज्योती कॉलनी, शिवकृपानगर, जोशी कॉलनी, अयोध्यानगरी, प्रशांत हिरेनगर, दामोदरनगर, वृंदावन कॉलनी, मोकळनगर, गणेश कॉलनी, औदुंबरनगर, गोपाळनगर आदी भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. गावठाणातही पाण्याची ओरड असून, एकीकडे गोदावरी खळाळून वाहत असताना दुसरीकडे नळाला थेंबथेंब पाणी येत असल्याने उपनगरांसह सरदार चौक, गणेशवाडी, शेरी मळा, सहजीवननगर, टकलेनगर, कृष्णनगर, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक या गावठाण भागातही अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

Women suffering due to Low pressure water supply in Hirawadi area nashik News
नाशिक : महापालिकेच्या रडारवर गोदाघाटावरील अतिक्रमण

उंच इमारतीत विद्युत मोटारीद्वारे पाणी पोचविले जात असल्याने त्या ठिकाणी मुबलक पाणी दुसरीकडे तळमजल्यावरही पाणी पोचत नसल्याची परिस्थिती पंचवटीच्या गावठाण भागात आहे. आधीच हा भाग उंचसखल असल्याने योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे विद्युत मोटारींच्या वापरामुळे अनेक ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. आलेतरी थेंबथेंब येत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला.

Women suffering due to Low pressure water supply in Hirawadi area nashik News
डाळिंबाची झाडे नटली जुन्या साडीत; अफलातून सुरक्षा कवच

बिलात वाढ

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने काहींनी विद्युत मोटारींचा आधार घेतल्याचे दिसून येते. एकीकडे घरात पाणी येत नसल्याने विद्युत मोटारींचा वापर करावा लागतो, तर दुसरीकडे त्यामुळे भरमसाट वीज बिले येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

Women suffering due to Low pressure water supply in Hirawadi area nashik News
Nandurbar | पोलिसांनी पकडली 1 लाखाची विदेशी दारू

"या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने अघोषित कपात केली आहे का, असा प्रश्‍न आहे. तांत्रिक अडचणी असल्यास दूर कराव्यात."

- रुची कुंभारकर, माजी नगरसेवक

"तीन चार महिन्यांपूर्वी नळाला योग्य दाबाने पुरेसा पाणीपुरवठा सुरू होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून केवळ अर्धा तासच नळाला पाणी येते."

- लता देशमुख

"गत काही दिवसांपासून नळाला अतिशय कमी दाबाने तेही कमी वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवते. एकवेळ का होईना योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा."

- प्रभाकर जावळे, सातपुडा कॉलनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com