Bike Rally : ‘घे भरारी’ तर्फे महिलांची दुचाकी रॅली; रस्ता सुरक्षा- वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women participating in a two-wheeler rally organized by Ghe Bharari organization on the occasion of Women's Day.

Bike Rally : ‘घे भरारी’ तर्फे महिलांची दुचाकी रॅली; रस्ता सुरक्षा- वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ

पंचवटी (जि. नाशिक) : दिंडोरी रोड येथील ‘घे भरारी’ संस्थेमार्फत महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरवात झुंबा डान्स द्वारे झाल्यानंतर, महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, गोरक्षनगर येथील पूनम मोटार ड्रायव्हिंग स्कूलपासून ढोल ताशांच्या गजरात रॅलीची सुरवात करण्यात आली. (Womens bike rally by Ghe Bharari Road Safety Oath to obey traffic rules nashik news)

ही रॅली म्हसरूळ गाव, आरटीओ ऑफिस मार्गे आल्यानंतर आरटीओ कॉर्नर येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या महिला अधिकारी नमिता सानप, देविका गुंजाळ, प्रांजली देवरे, माधुरी पालवे, पूजा शेवाळे, स्वाती सरदार आदी उपस्थित होत्या.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ दिली. या वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गिते यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

तर घे भरारी संस्थेच्या पूनम जाधव, पल्लवी टेपाळे, स्नेहा मोरे, सुजाता मोरे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या उद्दिष्टांबाबत उपस्थित महिलांना माहिती दिली. त्यानंतर महिलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

यामधील विजेत्यांना उत्कृष्ट वेषभूषा, उत्कृष्ट बुलेट रायडर, मी अॅन्ड मॉम, बेस्ट ट्विनिंग, सीनियर सिटीजन आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या वेळी पूनम मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि फिटनेस फाउंडर्स जिमतर्फे उपस्थित महिलांना लकी ड्रॉ डिस्काउंट कुपन देण्यात आले.

आभार वैशाली देवरे यांनी मानले. यानंतर कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घे भरारी ग्रुप च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikBike Rally