उपनगर- महाराष्ट्रात सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान गर्भवती महिला किंवा तिच्या बाळाच्या मृत्यूच्या घटना आपण ऐकत असतो. यामध्ये काही वेळा डॉक्टरांची चूक असते, तर काही वेळा रुग्णांचीही चूक असते. .मात्र नाशिक रोडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना आत्मविश्वास देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात गेल्या वर्षभरात एकही माता अथवा बालकाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे बिटको रुग्णालयातील प्रसूतीचा रेशो शंभर टक्के असल्याची गोष्ट निदर्शनास येत आहे. हे यश माता आणि तिच्या होणाऱ्या बालकावर यशस्वी उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टरांचे आहे..सरकारी रुग्णालयात माता मृत्यू झाल्यावर नातेवाईक डॉक्टरला मारहाण करतात, अंगावर धावून जातात किंवा हॉस्पिटलची तोडफोड करतात. मात्र गेल्या वर्षभरात बिटको रुग्णालयात झालेल्या दोन हजार ८८८ प्रसूतींपैकी एकाही मातेचा व नवजात बालकाचा मृत्यू झालेला नाही. म्हणून सर्वच लोक या हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आहेत..बिटको रुग्णालयात एकूण प्रसूतींपैकी एक हजार ६९० नैसर्गिक पद्धतीने, तर ८९८ प्रसूती शस्त्रक्रियेच्या माध्यमातून झाल्या. यामध्ये ५९७ प्रसूती अत्यंत जोखमीच्या होत्या. अशा परिस्थितीत रुग्णालयामध्ये माता आणि बालकांना येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि तज्ज्ञ परिचारिकांनी जगविले आहे. कमी स्टाफ असतानाही सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा देऊन प्रसूती विभाग लौकिकास पात्र झाला आहे. म्हणूनच महिला व बालकांच्या बाबतीत बिटको रुग्णालयाची आरोग्य सेवा ही सध्या हायटेक असल्याचे गणले जात आहे..बिटको रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांसह स्टाफ ट्रेन करण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिक उपचार पद्धती देणे आम्हाला सोयीचे होते. त्यामुळे आम्ही अतिउच्च जोखीम न घेता बालकांवर यशस्वी उपचार करीत असतो.- डॉ. शलाका बागूल, बालरुग्ण विभाग.हे यश सांघिक कामगिरीचे आहे. रुग्णालयात आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असे दोन वेळा एएनसीडेद्वारे राखीव वेळ देत गर्भवती रुग्णांची बारकाईने तपासणी केली जाते. रुग्णांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी खबरदारी घेतली जाते. वरिष्ठ पातळीवरूनदेखील सहकार्य लाभत आहे.- डॉ. शिल्पा काळे, निवासी वैद्यकीय अधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.