फोटो-22967
वडांगळी ः सेवा सप्ताहानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गौरविताना प्रताप पाटील, अशोक भवारी, सुदेश खुळे, नानासाहेब खुळे, नीलेश भुजाळ आदी.
अंगणवाडीसेविकांचा
वडांगळीत सन्मान
सिन्नर, ता. ७ ः सेवा संकल्प अभियानांतर्गत वडांगळी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सुदेश खुळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, प्रशासक डॉ. नीलेश भुजाळ, माजी सरपंच नानासाहेब खुळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सहाणे, विस्तार अधिकारी विजय पचलोरे, कृषी विस्तार अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत महाश्रमदान झाले. पोषण आहार प्रात्यक्षिक, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम व जंक फूडविरोधी जनजागृतीपर नाटिका, ‘पहिले पाऊल’ व ‘वेलकम मेळावा’, अन्नप्राशन, गरोदर व प्रसूत मातांना बेबी किट वाटप, बालकांचा वाढदिवस, हात धुण्याचे प्रात्यक्षिक, आकार कुशल प्रमाणपत्र वितरण आणि आरोग्य तपासणी असे उपक्रम राबविण्यात आले.
सुदेश खुळे यांनी पद कोणतेही असो, जबाबदारी छोटी-मोठी असो; जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्यासाठी झटणारा प्रत्येक हात सन्मानास पात्र असल्याचे सांगितले. अशोक भवारी यांनी सेवा सप्ताहातील हा उपक्रम अनेकांच्या मनात माणुसकीची आठवण ठेवून गेल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्याधिकारी प्रताप पाटील यांनी स्वच्छता, सेवा, त्याग समाजहितासाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन केले. सुरेश कहांडळ, राहुल खुळे, सुखदेव अढांगळे, अनिल अढांगळे, संजय अढांगळे, अमोल अढांगळे आदींनी संयोजन केले.