SHC26B13596
शिरपूर : ‘वुमेन्स एक्स्पो’च्या उद्घाटनासाठी उपस्थित माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, रिटा पटेल, उपनगराध्यक्षा संगीता देवरे व पदाधिकारी.
-------
बालाजी सेवा समितीच्या
वुमेन्स एक्स्पोला प्रतिसाद
शिरपूर, ता. ६ : येथील बालाजी सेवा समिती महिला विभागातर्फे राजगोपाल भंडारी सभागृहात ‘वुमेन्स एक्स्पो २०२६’ प्रदर्शन नुकतेच पार पडले. महिला उद्योजकांनी लावलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्सला हजारो ग्राहकांनी भेट देऊन खरेदी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे कपडे, ज्वेलरी, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तनिर्मित वस्तू, गृहपयोगी साहित्य, कलात्मक वस्तू आदी विविध स्टॉल्स लावण्यात आले. महिलांनी सुबक आणि कलात्मक रांगोळ्या साकारल्या. दिवसभरात ग्राहकांनी केलेल्या खरेदीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, एसव्हीकेएमच्या शिरपूर कॅम्पस प्रभारी रीताबेन पटेल यांनी उद्घाटन केले. कोअर कमिटीच्या दिव्या जैन, मीनाक्षी राठी, चारू पाटील, डिंपल गुजराती, तसलीम जळगाववाला उपस्थित होत्या.
शालिनी सोनवणे, स्मिता नाईक, कल्पना राजपूत, कल्पना कोळी, ज्योती कटारिया, संध्या जैन, कल्पना माळी, अनिता पाटील, भाग्यश्री राजपूत, वैशाली देवरे, सुजाता पटेल, सुचिता महाले, जयश्री जाधव, नेहा अग्रवाल, श्वेता दायमा, सीमा गुजराती, दीपाली शाह, संध्या सलुजा, गायत्री चौधरी, मानसी बाविस्कर, रंजना महाजन, अनुपमा राजपूत, आरती अग्रवाल, भारती साळुंखे, पूनम पाटील, अश्विनी राजपूत, भावना अग्रवाल, संगीता पाटील, ज्योत्स्ना पाटील, शीला चौधरी, प्रतिमा गायकवाड यांनी संयोजन केले.