नाशिक : शेतातून करा ऑफिसचं काम, नोकरदारांसाठी अनोखी सुविधा

पेठ रोडवरील अन्नपूर्णा फार्मवर नोकरदारांसाठी अनोखी सुविधा
nashik
nashiksakal

नाशिक : कोरोना महामारीमुळे(corona) जीवनशैली प्रभावित झाली असून, अनेक उद्योगांमध्ये वर्क फ्रॉम होमची(work form home) संकल्‍पना रुजली आहे. पण, घरून काम करताना अनेक अडथळे उद्‌भवतात. ही बाब हेरून पेठ रोडवरील अन्नपूर्णा फार्म येथे ‘वर्क फ्रॉम फार्म’ची संकल्‍पना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना निसर्गाच्‍या सान्निध्यात बसून, विनाअडथळा कार्यालयीन काम करण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाते आहे.

nashik
नाशिक : एमबीबीएस, बीडीएसच्‍या ऑप्‍शन फॉर्मची २८ जानेवारी पर्यंत मुदत

पेठ रोडवरील हॉटेल राऊ परिसरात असलेल्‍या अन्नपूर्णा फार्म येथे ही व्‍यवस्‍था नव्‍याने सुरू केली आहे. फार्मच्‍या आवारात आंब्‍याची बाग, ऊसशेती, नारळ, अंजिरीची झाडे असे निसर्गरम्‍य वातावरण आहे. सोबत कर्मचाऱ्यांना सुविधा व्‍हावी, यासाठी आराम खुर्च्या, इंटरनेट सुविधा सशुल्‍क उपलब्‍ध करून दिले आहेत. नुकतीच ही संकल्‍पना अवगत केली असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे. शहरापासून हाकेच्‍या अंतरावरील ठिकाण असल्‍याने दिवसभर येथे काम करून पुन्‍हा सायंकाळी घरी पोचणे शक्‍य होणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले. येथे कर्मचारी स्‍वतःसोबत घरचा डबा आणू शकतात किंवा नजीकच्‍या हॉटेलमधून ऑनलाइन ऑर्डरची सुविधाही आहे. नाशिकसह पुणे, मुंबई येथील कंपनी, उद्योगातील कर्मचाऱ्यांची सुविधा होणार आहे.

सहकुटुंब मेळाव्‍यासाठीही सुविधा

सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्‍येकाच्‍या जीवनाला तणावाने ग्रासले आहे. अशात विरंगुळा म्‍हणून सहकुटुंब मेळाव्‍याची सुविधा अन्नपूर्णा फार्म येथे उपलब्‍ध करून दिलेली आहे. याअंतर्गत राजस्‍थानी, गुजराथी व महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणाचे पर्याय उपलब्‍ध करून दिले जातात. वाढदिवस किंवा सोहळ्यासाठीदेखील जागा उपलब्‍ध असल्‍याचेही व्‍यवस्‍थापनातर्फे सांगण्यात आले आहे.

nashik
महामार्ग चौपदरीकरणासाठी तीव्र आंदोलन करणार; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा

नोकरदारांना आल्हाददायक व निसर्गरम्‍य वातावरणात शहरापासून नजीकच्‍या अंतरावर काम करण्याची सुविधा आम्‍ही ‘वर्क फ्रॉम फार्म’च्‍या (work from home)माध्यमातून उपलब्‍ध केली आहे. सोबत तणाव घालविण्यासाठी कौटुंबिक सोहळ्यांसाठी ही जागा आम्‍ही उपलब्‍ध करून देत असतो.

-कार्तिक ठक्‍कर, संचालक, अन्नपूर्णा फार्म

मी मुंबईतील कंपनीत कामाला असून, सध्या वर्क फ्रॉम होम(work from home) सुरू असल्‍याने नाशिकला आहे. अन्नपूर्णा फार्म येथे येऊन दैनंदिन काम करत मी घरी जात असते. निसर्गाच्‍या सान्निध्यात काम करताना कल्‍पकता वाढून कामाची गुणवत्तादेखील(family function) वाढल्‍याचा अनुभव मला आला.

-राधिका मजेठिया, युवती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com